नांदेड

नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढी विरुध्द ऍड रावसाहेब देशमुख यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनचे कारण देवून संपूर्ण महाराष्ट्रभर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती देत विद्यमान संचालक मंडळाला मुदत वाढ दिली आहे. त्या अनुषंगाने नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळालाही मुदतवाढ मिळाली आह.े सदरील मुदतवाढ ही गैरकायदेशीर असून ज्या बाजार समितीची चौकशी सुरु आहे. अशा बाजार समितींना मुदतवाढ देवू नये असा शासन निर्णय असतांना कॉग्रेसच्या नेत्यांनी आपले वजन वापरुन शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये सत्य परिस्थिती अशी आहे की, निलेश देशमुख बारडकर माजी तज्ञ संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेड यांनी कलम 40-ब अन्वये दिनांक 20 मार्च 2021 रोजी मा.जिल्हा उपनिबंधक, नांदेड यांचेकडे चौकशीसाठी तक्रारी अर्ज केला होता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने श्री पाटील साहेब यांना दिनांक 20 मार्च 2021 रोजी सदरील प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. त्या अनुगाने कलम 40-ब अन्वये तक्रारीवर चौकशी सुरु असतांना दिनांक 22 मार्च 2021 रोजी सदरील संचालक मंडळाला जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती संपूर्णपणे बेकायदेशीर व सहकार कायद्याच्या विरुध्द असल्यामुळे व तसेच शासन निर्णयाच्या विरुध्द असल्यामुळे सदरील संचालक मंडळाच्या मुदतवाढी विरुध्द भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. रावसाहेब देशमुख शिऊरकर व सामाजिक कार्यकर्ते अमोल कपाटे यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई ख्‌ंडपीठ औरंगाबाद येथे याचिका जिचा क्र.8688/2021 रावसाहेब व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर दाखल केली असून सदरील प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस काढून तिन आठवडयाच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश केले आहे. सदरील मुदतवाढीचा फायदा घेत विद्यमान संचालक मंडळ हे दरम्यानअनेक ठराव घेत आहेत जे की बेकायदेशीर असून त्यामध्ये विद्यमान संचालक मंडळाचे अर्थपुर्ण हित लपले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *