नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बालाजी मंदिराच्या पाठीमागे एक घरफोडून चोरट्यांनी एक लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. महेश ऍटो मोबाईल समोरच्या रस्त्यावर इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी 34 हजरांच्या ऐवजाची लुट केली आहे. भोकर येथील सुधा प्रकल्पाजवळून एक 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.
चंद्रकांत नंदुलाल लोढा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 8 वाजेदरम्यान नाथनगर, बालाजी मंदिर पाठीमागे लोहा येथे असलेले त्यांच्या घराचे मुख्यद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 22 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हे अधिक तपास करीत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेश ऍटो मोबाईलया दुकानासमोर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास विशाल रघुनाथ पाटील हे फोटोग्राफर आपल्या दुचाकी गाडीवरून जात असतांना एका नंबर नसलेल्या दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 9 हजार रुपये रोख रक्कम, 25 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा 34 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गोटके अधिक तपास करीत आहेत.
सदाशिव लक्ष्मण गुंजकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुधाप्रकल्प, किनाळा शिवार, भोकर येथून त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.टी.6832 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 5 ऑगस्टला दुपारी 1 ते 2 या एका तासाच्यावेळेत चोरीला गेली आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
