नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय राज्यघटना व प्रशासन या विषयांची बिनावट पुस्तके विक्री करणाऱ्या दोन जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरजकुमार सुधाकर पाटील मारुफळे रा.केसरीवाडा, नारायणपेठ पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते भगिरथ प्रकाशनाचे कुलमुख्त्यार आहेत. भगिरथ प्रकाशनाची भारतीय राज्यघटना व प्रशासन ही पुस्तके कॉपीकरून बनावट पध्दतीने ग्राहकांना विकली जात आहेत. बनावटपणा करून या पुस्तकांची विक्री करणारे महेश विष्णु संगेवार आणि नितीन मारोती बोडघे असे आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 321/2021 कलम 420, 468, 471 आणि 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
