क्राईम

महिलेच्या मृत्यूपूर्व जबाबामुळे तिन महिलांवर खूनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एक मृत्यूपुर्व जबाब प्राप्त झाल्यानंतर किनवट पोलीसांनी तीन महिलांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मयत महिलेला तिन महिलांनी जबरदस्तीने उंदीर मारण्याचे औषध पाजले होते असा मजकुर त्या मृत्यूपुर्व जबाबात आहे.
सिमा शेख जावेद (25) यांनी दि.23 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या तक्रारीत असलेल्या मजकुराप्रमाणे त्यावेळी किनवट पोलीसांनी गुन्हा क्रमांक 271/2021 कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील प्रकार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 या वेळेदरम्यान पेठफुलेनगर किनवट येथे घडला होता. या प्रकरणातील सिमा शेख जावेद या महिलेचा मृत्यूपुर्व जबाब किनवट पोलीसांना प्राप्त झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत सिमा शेखने हा मृत्यूपुर्व जबाब 14 ऑगस्ट रोजी दिला होता. त्यात तिने हिना जावेद शेख आणि तिच्या दोन जावा यांनी मिळून मला बळजबरीने उंदीर मारण्याचे औषध पाजले असे सांगितले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनात  महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *