नांदेड

प्रवाशांच्या सुविधेसाठी 20 रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षीत डब्बे

नांदेड(प्रतिनिधी)-कोविड कालखंडानंतर दक्षीण मध्य रेल्वेने 20 विशेष रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी काही डब्बे अनारक्षीत केले आहेत.दि.22 ऑगस्टपासून अनारक्षीत डब्यांची सुरूवात करण्यात आली आहे.
दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकानुसार 20 रेल्वे गाड्यांमध्ये काही डब्बे अनारक्षीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होणार नाही. अनारक्षीत केलेल्या रेल्वे गाड्यांचा क्रमांक, त्या गाड्या कोठून येतात कोठे जातात, त्यात अनारक्षीत डब्बे कोणते आणि कोणत्या तारखेला या गाड्या धावणार अशा क्रमाने वाचकांसाठी माहिती आम्ही देत आहोत.
दि.27 ऑगस्ट 2021 गाडी संख्या 0721, नरसापुर-नगरसोल, अनारक्षीत डब्बे डी.एल.-1, डी.एल.-2. दि.28 ऑगस्ट गाडी संख्या 07232 नगरसोल नरसापुर डी.एल.1,-डी.एल.2 दि.28 ऑगस्ट गाडी संख्या 02713 नरसापूर-नगरसोल डी.एल.1-डी.एल.2. दि.29 ऑगस्ट गाडी संख्या 02414 नगरसोल नगरसापूर डी.एल.1,डी.एल.2. दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07405 तिरुपती-अदिलाबाद-डी.14, डी.15,डी.16,डी.17 आणि डी.एल.1. दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07406 आदिलाबाद-तिरुपती, डी.एल.1, डी.एल.2. दि.27 ऑगस्ट गाडी संख्या 07621 औरंगाबाद-रेणीगुंठा, डी.एल.1, डी.एल.2. दि.28 ऑगस्ट गाडी संख्या 07622 रेणीगुंठा-औरंगाबाद-डी.एल.1, डी.एल.2, दि.30 ऑगस्ट गाडी संख्या 07639 काचीगुडा-अकोला डी.एल.1, डी.एल.2, दि.31 ऑगस्ट गाडी संख्या 07640 अकोला-काचीगुडा डी.एल.1, डी.एल.2.दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07049 हैद्राबाद-औरंगाबाद डी.एल.1, डी.एल.2. दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07050 औरंगाबाद-हैद्राबाद डी.एल.1, डी.एल.2. दि.24 ऑगस्ट 2021 गाडी संख्या 07409 आदिलाबाद -नांदेड डी.एल.6, डी.एल.7. दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07410 नांदेड-आदिलाबाद-डी.एल.6, डी.एल.7. दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07691 नांदेड-सिंकदराबाद डी.एल.1, डी.एल.2, दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07692 सिकंदराबाद-नांदेड-डी.एल.1, डी.एल.2, दि.24 ऑगस्ट गाडी संख्या 07619 नांदेड-औरंगाबाद-डी.एल.1, डी.एल.2, एस.4 आणि एस.9 दि.30 ऑगस्ट गाडी संख्या 07620 औरंगाबाद-नांदेड डी.एल.1, डी.एल.2, एस.4, एस.9 असे सर्व डबे अनारक्षीत ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे अचानकच प्रवास उदभवलेल्या प्रवाशांसाठी ही सोय दक्षीणमध्ये रेेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.