नांदेड

अचानक आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या;दैवाने दोघीना जीवदान दिले 

नांदेड,(प्रतिनिधी)-पुराच्या प्रवाहात दोन महिला वाहून गेल्या असल्याची दुर्दैवी घटना शिवणी येथे घडली.रोज मजुरीच्या कामासाठी शेतामध्ये मजुरीसाठी गेलेल्या चार महिला परतीच्या वाटेने घराकडे येत असताना  अचानक नाल्याला पूर आल्याने या पुराच्या प्रवाहाच्या चौघीजणी अडकल्या त्यापैकी दोघी जणी  या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या असुन दोघींनी आपला जीव  वाचण्यात यश मिळवले आहे.ही घटना दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
           आज मंगळवारी किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अचानकपणे पाऊस झाला. त्यामुळे नाल्याला पुर आला. या पुराच्या पाण्यात शेतात रोज मजुरी करणाऱ्या चार महिला परत येत असतांना वाहून गेल्या. त्यात दोन महिलांना आपला जीव वाचविण्यात यश मिळवले. तर दोन महिला तब्बल दोन किलोमीटर अंतरावर नाल्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या बुडाला अडकल्या आणि वाचल्या. पण  दोन महिला मृत अवस्थेत आढळून आलल्या.   त्या मरण पावलेल्या  महिलांचे नाव  महेजबीन रज्जाक अगुवाड (वय 60) व प्रेमीलाबाई लचन्ना तमलवाड (वय 60) आहे दुर्दैवी  घटनेची माहिती मिळताच येथील सरपंच लक्ष्मीबाई डुडूळे, उपसरपंच संतोष जाधव,  भाजपा सरचिटणीस बालाजी अल्लेवार, शिवसेनेचे युवा नेते गजानन बच्चेवार,  साई प्रसाद कारलेवाड, नागेश बेलेवार, राजेश बेरेड्डी, बालगंगाराम भुसेवाड, माजी सरपंच निर्मलाबाई बोंदरवाड, दत्ता भैरे, राजू भैरे, गणपत राठोड यांच्यासह अनेक नागरीकांनी  घटनास्थळी धाव घेतली.
           या  घटनेची माहिती किनवट येथील तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  तसेच शवविच्छेदन करण्यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यास सुचना दिल्या व मयताच्या नातेवाईकांना भेटुन दिलासा दिला. शासनाकडून जे काही मदत करता येईल ती मदत करू अशी ग्वाही यावेळी दिली.सदरील घटनास्थळी इस्लापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथे पाठववीले आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.