नांदेड

भाजप कट्टरवाद आणि धर्मवाद पसरवत आहे-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या ईतिहासातील कॉंगे्रसचा सहभाग युवकांपर्यंत पोहचावा आणि भाजप प्रणित चुकीचा ईतिहास दाखविण्याची वृत्ती खोडण्यात यावी यासाठी उद्या दि.24 ऑगस्ट रोजी नांदेड-परभणी-हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमधील कॉंगे्रस जिल्हा कमिटीला नांदेड येथे निमंत्रीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कॉंगे्रसचे बरेच मंत्री, माजी मंत्री आणि कॉंगे्रसचे पदाधिकाीर हजर राहणार आहेत अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
24 ऑगस्ट रोजी नांदेड येथे व्यर्थ न हो बलिदान चलो बचाये संविधान या शिर्षकाचा कार्यक्रम आणि कॉंगे्रस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. स्वातंत्र्याचा खऱ्या ईतिहास युवकांसमोर मांडता यावा आणि भाजपच्यावतीने चुकीचा ईतिहास मांडण्याची जी पध्दत सुरू आहे त्याला खोडता यावे असे या कार्यक्रमाचे नियोजन असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. कट्टरवाद आणि धर्मवादाचे दुष्परीणाम सांगतांना अशोक चव्हाण यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानचा उल्लेख केला. भाजपने कट्टरवाद पसरविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंगे्रसचा प्रभाव सुध्दा स्वातंत्र्यांच्या ईतिहासात मोठा आहे असे अशोक चव्हाण म्हणाले. ही सर्व सत्यता जनतेसमोर मांडणे आणि त्यातून खरा ईतिहास सांगण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेत विनायकराव देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, गोविंदराव शिंदे नागेलीकर, मसुद खान, विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक मुन्तजिबोद्दीन, विजय येवनकर यांची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.