क्राईम

मराठा मुक आंदोलन आयोजित करणाऱ्या 21 जणांवर गुन्हा दाखल


नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मुक आंदोलन बिना परवानगीचेच झाले, कोविड नियमावलींचा भंग करण्यात आला अशा स्वरुपाचा गुन्हा 21 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी दाखल केला आहे.
वजिराबाद येथील पोलीस उपनिरिक्षक रमेश शंकरराव खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 ऑगस्टच्या सकाळी 11 ते दुपारी 1.30 दरम्यान छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा मुक मोर्चाचे आयोजन केले. त्यात जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश भंग झाला.आंदोलनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणुच्या संदर्भाने असलेल्या शारिरीक अंतराचे पालन न करता कोरोना विषाणु वाढेल अशी कृती केली. असे कृत्य करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, सदा पुयड पाटील, निरंजन कदम पाटील, सुनिल कदम पाटील, नवनाथ जोगदंड पाटील, वैभव भिसीकर, राजेश मोरे, शिवाजी हंबर्डे, एन.टी.जाधव, महेश शामराव जाधव, सुरेश लोेट, तिरुपती भगनुरे पाटील, बाला कदम पाटील, सुभाष कोल्हे, सोपान नेव्हल पाटील, तानाजी नेव्हल पाटील, गिरीश जाधव, धनंजय सुर्यवंशी, शुभम घोरबांड, सुनिल तेलंग आणि विजय कदम या 21 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269, 270, 34 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाय योजना नियमावली 2020 मधील कलम 11 सोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 च्या कलम 51 (ब) सोबत महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार गुन्हा क्रमांक 286/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल पन्हाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.