नांदेड(प्रतिनिधी)-अनुसुचित जाती, जमाती, विजा-भज, इमाव, विमाप्र आदी जातींच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिकेसमोर उपोषणास प्रारंभ केला.
आरोग्य सेवा संचालनाला दिलेल्या निवेदना या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नमुद केले आहे की, आम्ही हंगामी फवारणी कर्मचारी आहोत त्यांची सतत दिशाभुल केली जात आहे. आमच्या विविध न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही 19 ऑगस्ट 2021 पासून संघटनेच्यावतीने विविध प्रकारचे आंदोलन व उपोषण करणार आहोत. या निवेदनावर हिवताप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पांडूरंगजी वाघमारे,सहसचिव सतिश संभाजी वडजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आज या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनादरम्यान बोंब मारो, ढोल बजावो, ढफली बजावो, पुंगी बजावो, भिक मागो या पध्दतीचे आंदोलन केले जाणार आहे. किटक नाशक औषधी फवारणी करतांना होणारा त्रास आम्ही सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी घेतो तरीपण आमच्याबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी व आरोग्य अधिकारी दिशाभुल करण्यासारखे काम करतात. त्यामुळे आमच्या मागण्या त्वरीत मागण्या कराव्यात अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
