नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करतांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
आज 20 ऑगस्ट भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन आहे. राजीव गांधी यांच्यानंतर या दिवसाला सदभावना दिवस या संज्ञेत पाळले जाते. समाजात सदभावना ठेवावी हा हेतू घेवून या दिवशी एक प्रतिज्ञेचे वाचन होते. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ही प्रतिज्ञा वाचून दाखवली. त्या पाठोपाठ उपस्थित अधिकारी, पोलीस अंमलार आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी त्या प्रतिज्ञेचे वाचन केले.
या प्रसंगी पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे, राखीव पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, राखीव पोलीस उपनिरिक्षक शिवाजी पाटील, कार्यालय अधिक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमदार, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे, रेखा इंगळे यांनी उत्कृष्टपणे केले.
