महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्याचा शूरविर अधिकारी नक्षलवाद्यांच्या हल्यात धारातिर्थी पडला

पंजाबचा एक जवान सुध्दा देशाच्या कामी आला
नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद जवळ छोट्याशा बामणी गावातील इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)मध्ये कार्यरत सहाय्यक समादेशक सुधाकर शिंदे आज देशाची सेवा करतांना धारातिर्थी पडले आहेत. हा हल्ला आज 20 ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी घात लावून केला. या हल्यात पंजाब येथील गुरमुखसिंघ यांचाही देह देशाच्या कामी आला.
नांदेड जिल्ह्यातील बामणी ता.मुखेड या गावचे सुधाकर शिंदे हे सन 2000 मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त करून सन 2001 मध्ये आयटीबीपीमध्ये सब इन्सपेक्टर या पदावर रुजू झाले. महाराष्ट्राची शान वाढवत त्यांनी हळूहळू सहाय्यक समादेशक (असीस्टंट कमांडट) या पदापर्यंत पदोन्नती मिळवली. सन 2019 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगड राज्यात नक्षल प्रतिबंधक पथकात झाली.
आज दि.20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्यात सुधाकर शिंदेसह एएसआय गुरमुखसिंघ हे दोन अधिकारी धारातिर्थी पडले आहेत. नक्षलवाद्यांनी दोन बुलेटप्रुफ जॅकेट, एक वायरलेस सेट, एक ए.के.47 रायफल आणि गोळ्या लुटून नेल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका शुरविराने नक्षलवाद्यांशी लढतांना आपला जीव देशासाठी अर्पण करून एक आदर्श दाखवला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *