चोरी घटनांमध्ये तीन लाख 99 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ चावडी येथे एक घर फोड्यात आले आहे. घुंगराळा येथे एका मोबाईल दुकानाचे शर्ट फोडून चोरी करण्यात आली आहे. किनवट येथे एका फायनान्स कंपीनमध्ये रोख रक्कमेची तिजोरीच चोरट्यांनी चोरून नेली पण ती सुदैवाने परत मिळाली. नांदेड शहरातील विद्युतनगर, लोहा येथील कळसकर हॉटेल जवळ या दोन ठिकाणावरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. शहरातील विनायकनगर येथून 2 गायी चोरण्यात आल्या आहेत. कोल्हापुरी बंधाऱ्याचे दहा गेट चोरून नेण्याचा प्रकार वाका ता.लोहा येथे घडला आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये एकूण 3 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
नागोराव बालाजी पेंटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते आणि त्यांची पत्नी मनपाच्या सिडको येथील दवाखान्यात कोविड लस घेण्यासाठी गेल्या असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून रोख 60 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
गजानन किशनराव कांचमवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे घुंगराळा येथे त्यांची मोबाईल दुकान आहे. 17 ऑगस्टच्या रात्री 7.30 ते 18 ऑगस्टच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल दुकानाचे शटर वर करून आतील मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तुमरे अधिक तपास करीत आहेत.
क्रिडा संकुल किनवट येथे महिंद्रा रुरल फायनान्स शाखा आहे. या शाखेचे वैभव विश्र्वंभर कौशल्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑगस्टच्या 7.15 ते 18 ऑगस्टच्या 8.30 या वेळेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी फायनान्स शाखेचे शटर उचलून आत रोख रक्कम असलेली तिजोरी उचलून नेली. पण ती तशीच परत मिळाली किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
विद्युतनगर नांदेड येथून 11 नोव्हेंबर 2020 रोजी चोरी गेलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.पी.8483 या गाडीच्या चोरीचा गुन्हा 18 ऑगस्ट 2021 रोजी दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार संजय तुकाराम क्षीरसागर यांनी दिली आहे. चोरीला गेलेल्या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुरूळेकर अधिक तपास करीत आहेत.
सोमपुरी बाबूबुवा पुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कळसकर हॉटेलजवळ त्यांनी उभी केलेली 30 हजार रुपये किंमतीची गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.5810 ही 18 ऑगस्टला सकाळी 5 वाजता चोरीला गेली. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
गजानन विष्णु गंगावन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 ऑगस्ट 2021 च्या रात्री 8 ते 16 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोर खुंट्याला बांधलेल्या दोन गायी 50 हजार रुपये किंमतीच्या कोणी तरी चोरून वाहनात भरून नेल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
विकास राजाराम चिंतरवाड हे कालवा निरिक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जुलै 2021 च्या सकाळी 9 ते 29 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेदरम्यान वाका क्षेत्रातून कोल्हापुरी बंधाऱ्यावरील 12 गेट काढून आबाराव दत्तराम हंबर्डे यांच्या शेताच्या आखाड्यावर ठेवले होते. त्यातील 10 लोखंडी गेट, 48 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत.
