एका कुटूंबातील तीन व्यक्तीसह 5 जणांवर गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-लोकांना सरकारी नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाच कुटूंबातील तीन जण आरोपी आहेत.
नामदेव दादाराव नवघरे रा.वाहतुकनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 ऑक्टोबर 2020 ते 21 नोव्हेंबर 2020 दरम्यान नांदेड येथील रुद्रांकुर प्रशांत इंदूरकर, नम्रता इंदूरकर, प्रविण इंदूरकर, संदीप परशुराम कदम आणि औरंगाबाद येथील संतोष देशमुख उर्फ संतोष समाधान जामनीक या पाच जणांनी नामदेव नवघरे आणि त्याच्यासोबत इतर अनेकांना सरकारी नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून अंदाजे 1 ते दीड कोटी रुपये घेवून त्यांची फसवणूक केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 468, 470, 34 नुसार गुन्हा क्रमांक 278/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु सोळुंके यांच्याकडे देण्यात आला आहे.
