नांदेड(प्रतिनिधी)-वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी दानशूरांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेेचे अध्यक्ष पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी केले.
शहरात संध्या छाया वृध्दाश्रम कार्यरत आहे. वृध्दांच्या या आश्रमातील संख्या वाढतांना पाहुन त्यात असणारी जागा अपुर्ण होईल म्हणून या वृध्दाश्रमाच्या जागेचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी शहरातील दानशूर व्यक्तीमत्वे अजित जिल्हेवार, प्रा.डॉ.अंजली चौधरी, डॉ.सौ.पल्लवी तुंगेनवार, विद्युतलता वाळवेकर, अनिल पांपटवार, संजय औरादकर इत्यादींनी पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. या वृध्दाश्रमाचे विस्तारीकरण करण्यासाठी लागणारा निधी दानशूरांनी द्यावा असे आवाहन डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी केले. या कार्यक्रमात अशोक तेरकर, सुरेखा पाटणी, धर्मप्रकाश आग्रवाल, डॉ.किरण चिद्रावार, अनिल पांपटवार, अलका पांपटवार, दी.मा.देशमुख, जयंतराव वाकोडकर, विद्या आळणे, गिताराम अग्रवाल, रामप्रसाद बाहेती, वृध्दाश्रमातील सर्व सदस्य, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.एस.वाघमारे यांनी केले. तर आभार धर्मप्रकाश अग्रवाल यांनी मानले.
