नांदेड

सर्वसामान्यांची जलतरणिका बंद आणि नांदेड क्लबची सुरु 

रणजित नरवाडे यांचा मनपाकडे अर्ज दिला 
नांदेड,(प्रतिनिधी) -नांदेड मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली जलतरणिका मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. ती सुरु करावी अशी मागणी रणजित नरवाडे यांनी केली आहे. 
                         नांदेड वाघाळा महानगर पालिकेची  सर्वसामान्यांसाठी असलेली जलतरणिका महिला तीन वर्षांपासून बंद आहे.सर्वसामान्य नागरिकाला हि जलतरणिका वरदान आहे. पण ती बंद असल्याने नागरिकांची परिस्थिती अवघड झाली आहे.दुसरीकडे नांदेड क्लबची जलतरणिका सुरु आहे.तेथे जाण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागतात.ती ऐपत सर्वसामान्य माणसाची नसते. जलतरण खेळाडूंचे सुद्धा या मुले हाल होत आहेत.
                    हि सर्वसामान्य नागरिकांसाठीची जलतरणिका मागील तीन वर्षांपासून दुरुस्ती आणि नंतर कोरोना महामारी या नावावर बंद आहे.त्यामुळे खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक यांचे नुकसान होत आहे.जलतरणिका आताच सुरु करण्याचे आदेश झाले आहेत.पण नांदेड क्लबची जलतरणिका मागील तीन महिनांपासून सुरु आहे. तरी आतातरी नांदेड मनपाची सर्वसामान्य माणसाची जलतरणिका लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी रणजित गोपीनाथ नरवाडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *