क्राईम

मंजुर नकाशाविरुध्द काम करणाऱ्या खियानी व भगत विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम करतांना त्यांची परवागनी घेणे आणि मंजुर नकाशाप्रमाणे काम करणे ही बांधकाम करणाऱ्याची जबाबदारी असते. याविरुध्द काम करणाऱ्या दोन जणांविरुध्द महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत.
महानगरपालिकेने प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात नमुद आहे की, महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको अंतर्गत येणाऱ्या भागात भुखंड क्रमांक 14 व 23, सर्व्हे नं.67/1 येथे मिनाबाई जुगलकिशोर खियानी यांनी आणि वसरणी येथील गट क्रमांक 4 भागात नंदलाल मुन्नालाल भगत यांनी परवानगी पेक्षा व मंजुर नकाशाविरुध्द जास्तीचे बांधकाम केले. याबद्दलचा पंचनामा करून दोघांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनात सिडको झोनचे अधिकारी अविनाश अटकोरे यांनी भगत आणि खियानी विरुध्द नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 अन्वये दोन गुन्हे दाखल केल आहेत. मालमत्ता धारकांनी बांधकाम परवानगी घेवूनच बांधकाम करावे अन्यथा त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *