नांदेड

पावसाची तमा न बाळगता काम करणाऱ्या वाहतुक शाखेच्या पोलीस अंमलदाराची पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी घेतली दखल

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात काम करतांना मेहनत घेणाऱ्याची किंमत नसते असा समज आहे. हा समज पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी खोटा ठरविला असून नांदेड वाहतुक शाखा क्रमांक 1 मधील पोलीस अंमलदार अशोक वाडेवाले यांना 10 हजार रुपये बक्षीस देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 8 यावेळे दरम्यान नांदेड शहरात अचानकपण भेटी देत असतांना त्यांना अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुक शाखेचा पोलीस अंमलदार पाऊस पडत असतांना पाऊसाची चिंता न करता काम करत होता. यावेळी पाऊस पडतांना साठे चौकाच्या मधोमध उभे राहून हे पोलीस अंमलदार वाहनांवर नियंत्रण ठेवत होते. पोलीस उपमहानिरिक्षकांनी पाहिलेली त्या ठिकाणची वाहतुक एकट्या व्यक्तीला नियंत्रीत करण्याच्या कक्षेबाहेरील होती. हा घटनाक्रम पाहिल्यावर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना पोलीस अंमलदार अशोक गणेशलाल वाडेवाले यांच्या सचोटी आणि इमानदारीवर झालेला आनंद व्यक्त करतांना त्यांनी 17 ऑगस्ट रोजी आपल्या पोलीसी कर्तव्याला महत्व देवून आपल्या आरोग्याची चिंता न करता काम केले म्हणून वाडेवाले यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस देवून त्यांचा गौरव केला आहे.


वाहतुक शाखेतील पोलीस अंमलदार अशोक वाडेवाले हे एकमेव असे पोलीस अंमलदार आहे की, त्यांनी कधीच आपली टोपी खिशात ठेवलेली कोणी पाहिलेली नाही. त्यांना आपल्या नैसर्गिक विधीसाठी जाण्याची सुध्दा वेळ आली तर त्यांनी आपल्या सहकाऱ्याला तेथे बोलावले. त्याला आपल्या जागी उभे केले आणि आपली नैसर्गिक विधी संपवून त्याचे धन्यवाद व्यक्त केले. पोलीस दलामध्ये मेहनत करणाऱ्यांची कदर नाही असा एक गैरसमज आहे. हा गैरसमज पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी खोटा ठरविला आहे. आपल्याला जे काम आवडते ते निवडावे किंवा आपल्याला मिळालेल्या कामामध्ये आपली आवड निर्माण करावे. हा एकच पर्याय असा आहे की ज्यामुळे आपण आपले काम योग्य आणि दखल योग्य करू शकतो. असेच काम करून अशोक वाडेवाले यांनी पोलीस उपमहानिरिक्षकांच्या हाताने मिळविलेला सन्मान दखल योग्य आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *