लेख

कर्दनकाळ पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर 

आपल्या जीवनाची सुरूवात होते तेंव्हा आपल्यासाठी जग अनभिज्ञ असते. आपल्या जीवनाचा आकार आई-वडील संस्कारातून सुरू करतात. दगड असलेले आपण शाळेत जातो तेंव्हा दगडाला कोरून त्याचे शिल्प तयार करतो तो शिक्षक. शिक्षकाने तयार केलेले हे शिल्प जीवनाच्या उंबरठ्यावर आपला पाय ठेवून सुरू करतो आपल्या जीवनाची दिक्षा शोधणे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शक सापडला तर ती दिशा योग्य ठरते आणि जीवनाचे ध्येय निश्चित केले जाते. आपण स्वत: निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना सर्वत्र काटेरी वाटा असतात आणि त्या वाटा आपल्याला ध्येयाकडे जाण्यापासून परावृत्त करत असतात. पण आपला संयम त्यावेळी खुप महत्वाचा असतो. तो संयमच आपल्याला ध्येयाकडे नेतो. अशाच काटेरी वाटातून आज नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारकादास चिखलीकर यांना जन्म दिनाच्या शुभकामना देतांना छोटीशी शब्दांजली त्यांना समर्पित आहे.
नांदेडपासून लातूर जिल्ह्याकडे जातांना माळेगाव नंतर सुरू होणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यात गोविंदरावजी चिखलीकर त्यांच्या पत्नी सौ.शालुबाई ह्या राहत होत्या. शेत आणि घर याच्या पलिकडे गोविंदरावांना कांही माहित नव्हते. शेतातील पिकलेले धान्य, भाज्या, ऊस  आदी बाजारापर्यंत नेले आणि लवकरात लवकर घरी परत येणे यापेक्षा जास्त मोठे विश्र्व त्यांचे नव्हते. गोविंदरावजी आणि सौ.शालुबाईजी यांच्या बागेत तीन मुले आणि दोन मुली अशी फुले उमलली. त्यात सर्वात शेवटी 18 ऑगस्ट 1968 रोजी द्वारकादास यांचा जन्म झाला. बालपण संपल्यानंतर जिल्हा परिषद शाळा चिखली येथे प्राथमिक शिक्षण घेत-घेत द्वारकादास वडीलांच्या आदेशानुसार म्हशी राखणे ते बाजारात जाऊन भाजी विकून त्याचे पैसे आणून वडीलांना हिशोब देणे अशी कामे सुध्दा करीत होते. फादर्स हार्ट इज द मास्टर पिस ऑफ नेचर या शब्दांवर विश्र्वास ठेवून आपल्या वडीलांचा आदेश हा सर्वोत्तम आहे हीच बाब चिखलीकरांच्या जीवनासाठी मार्गदर्शक ठरली.  हायस्कुलचे शिक्षण किनगाव जवळील सोनखेड येथे घेतले. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दयानंद महाविद्याल लातूर येथे घेतले. सर्वात लहान असल्यामुळे द्वारकादास यांना नकटे व्हावे पण धाकटे नव्हे या म्हणीचा प्रत्यय जीवनात अनेकदा आला. पण मोठ्यांनी सांगितलेल्या बाबी उलट दिशेने न घेता सकारात्मक दृष्टी कोणातून घेतल्यामुळे त्यांच्या जीवनाची प्रगती शैक्षणिक विभागात पदव्युत्तरपर्यंत झाली.
1989 मध्ये लातूर जिल्हा पोलीस दलात ते पोलीस शिपाई पदासाठी गुणवत्ता यादीत आले. लातूर जिल्ह्यात सुरूवातीची पाच वर्ष स्थानिक गुन्हा शाखेत काम केले. त्यानंतर वाढोणा आणि जळकोट पोलीस ठाण्यात काम केले. पोलीस झाल्यानंतर 1991 मध्ये एक शिक्षक म्हणून नामांकित असलेल्या मा.अंजनरावजी शेप यांनी आपली कन्या स्मिता ही द्वारकादास यांची पत्नी म्हणून त्यांच्याकडे पुढील जीवनासाठी हवाली केली. द्वारकादास आणि सौ.स्मिताजी यांच्या अंगणात मोहिनी आणि अभिजित नावाचे आपत्ये आली. 1998 मध्ये विभागीय परिक्षा उत्तीर्ण करून द्वारकादास चिखलीकर पोलीस उपनिरिक्षक झाले. पोलीस उपनिरिक्षक या पदावर असतांना वाशिम जिल्ह्यातील रिसोड, बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या पोलीस ठाण्यात काम केले. सोबतच बीड येथील पोलीस अधिक्षकांच्या वाचक पदावर सुध्दा काम केले. सन 2011 मध्ये त्यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती प्राप्त झाली. त्यात त्यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील पाचोड, सिल्लेगाव, करमाढ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा या पोलीस ठाण्यात कार्य केले. सन 2017 मध्ये त्यांना पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यांचे आगमन नांदेड जिल्ह्यात झाले. आगमन होताच देगलूर, त्यानंतर नांदेड ग्रामीण आणि त्यानंतर पुन्हा एकदा देगलूर अशी नियुक्ती त्यांना मिळाली. या पुढे 26 डिसेंबर  2019 रोजी  त्यांची नियुक्ती नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत झाली.
18 ऑगस्ट 2021 पर्यंत त्यांच्या नियुक्तीला 599 दिवस पुर्ण होता. या पुर्वी स्थानिक गुन्हा शाखा  नांदेडचा मागील 10 वर्षातील ईतिहास कोणताही पोलीस निरिक्षक  या पदावर 365 दिवस पण टिकला नाही. सोबतच स्थानिक गुन्हा शाखेचा मागील 20 वर्षाचा ईतिहास विचारात घेतला तर 599 दिवसांमध्ये नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने केलेले कामगिरी प्रशंसनिय आहे. मागील 20 वर्षांमध्ये नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत काम केलेले पोलीस निरिक्षकांनी स्वत:चे आत्मपरिक्षण केले तर या 599 दिवसांचा अभिलेख पाहुन त्यांना लाच वाटल्याशिवाय राहणार नाही. स्थानिग गुन्हा शाखेत काम करतांना एक उत्तम प्रशासक त्यांच्यात दिसतो. जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्याची माहिती पोलीस अधिक्षकांना मिळते. तशीच माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळावी अशी सोय आहे. पहाट झाल्याबरोबर जिल्ह्यात काय घडले होते. हे पाहुन त्यातील कोणत्या कामासाठी आपली माणसे पाठवली पाहिजे याचा निर्णय चिखलीकर घेतात आणि त्या कामाला सुरूवात होते. मागील 599 दिवसांमध्ये त्यांनी सुरू केलेल्या कामाला अपयश आल्याची माहिती नाही. पण एक मारेकरी ज्याने सन 2017 मध्ये खून केला होता त्याला जेरबंद करणे हा त्यांचा उद्देश आहे. आणि त्यावर ते काम सुध्दा करत आहेत. तोंड दाबून बुक्यांचा मार या म्हणीसोबत पोलीस खात्याबद्दल बोलले जाते. पण चिखलीकरांनी अनेकदा आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसाठी, पोलीस अंमलदारांसाठी पोलीस उपमहानिरिक्षक, पोलीस अधिक्षक यांच्यासमोर सुध्दा बाजू मांडतांना त्यात कांही कमीपणा जाणून घेतला नाही. कार्यालयात काम करतांना दोन नियम आहेत. नियम नंबर 1 बॉस इज ऑलवेज राईट आणि नियम नंबर 2 इफ ही इज रॉंग दॅन सी रुल नंबर 1 या पध्दतीत त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्येक शब्दाला दिलेला ओ महत्वपुर्ण ठरला. पोलीस दलात सर मी जावून येतो असा एक शब्द आहे जो त्या दिवशी ड्युटी ऐवजी आपले व्यक्तीगत कामाला येतात. स्थानिक गुन्हा शाखेत जावू येतो या शब्दांचा सुध्दा  अभिलेख तयार आहे. त्यावरून त्यांच्यातील आपल्या अंमलदारांवर वचक ठेवण्याची वृत्ती कळते. अत्यंत प्रोफेशनल अधिकारी म्हणून चिखलीकरची ख्याती आहे. पण या प्रोफेशनमध्ये त्यांनी विसरणे आणि सामोरे जाणे या दोन्ही बाबींना कधीच नकार दिला नाही. सर्व काही आपल्या जवळ असतांना रुबाब न दाखवता संयम राखण्याची कला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या एका प्रेमीने त्यांना दिली. आणि त्यांनी ती अंगीकारली आणि अंमलात आणि याबद्दल ते नेहमी बोलतात सुध्दा. स्थानिक गुन्हा शाखेतील नियुक्तीनंतर माझ्यातील संयम वाढला आणि तो कोणामुळे याचा सुध्दा विसर त्यांना पडला नाही आणि आपल्या जीवनात त्याचा उल्लेख ते करतात यावरून त्यांची सादरीकरणाची पध्दत लक्षात येते. मरतांना थोडेसेच विष प्यावे लागते पण जगतांना विषांचे पेले प्यावे लागतात आणि ते पचवावे लागता ही ताकत असलेल्या द्वारकादास चिखलीकरांनी पुर्ण केले आहे. कधी-कधी शत्रु सुध्दा आपले कौतुक करतात आणि हीच सर्वोत्तम किर्ती प्राप्त करण्याचा मान चिखलीकरांकडे आहे. अनेकवेळा लोक मदतीचे नाटक करीत असतात. अशा परिस्थितीत त्या पात्रांना तुमचा अभिनय योग्य बनविण्याचे निर्देश सुध्दा चिखलीकर त्यांना देतात यावरुन त्यांच्या ताकतीची कल्पना करता येईल. सर्वसामान्य पणे स्वत:साठी एक सुंदर घर तयार करणे हे एक स्वप्न सर्वांचे असते. पण इतरांच्या मनात आपले घर तयार करण्याची ताकत चिखलीकरांत आहे.
अनेक लोकांचे अनेक शब्द त्यांच्याबद्दल आहेत. पण त्या लोकांनी चिखलीकरांना ओळखलेच नाही असे लिहावे वाटते. आपले काम करत असतांना जग द्वारकादासला नाव ठेवण्यात व्यस्त होते आणि द्वारकादास आपले नाव कमावण्यात व्यस्थ होते. त्यामुळे संघर्षाचा प्रश्न आला नाही. पण कांही जणांना नक्कीच त्यांची प्रगती दुखते. असे होणे हा नैसर्गिक भाग आहे. जगात सर्व संत नाहीत. त्यामुळे द्वेष भावना नेहमीच आपले डोके वर काढत असते. लोक चिखलीकरांना सुध्दा सांगतात. तुमच्या काखोटीत साप आहे. तर ते उत्तर देतात माझे अस्थित्वच  चंदनासारखे आहे. तेंव्हा मी तरी काय करू. चिखलीकरांचे मन खुप मोठे आहे. म्हणूनच आपल्या जीवनात त्यांच्याकडे मैत्रीचा भंडार आहे. शत्रु नसतील असे नाही पण मैत्रीच्या भंडारामुळे शत्रुंची नेहमीच पिछेहाट झालेली आहे. आपले काम करत असतांना चिखलीकरांनी अनेकदा आपल्या कौटूंबिक  गरजांकडे सुध्दा दुर्लक्ष केले. त्यात सौ.स्मिता चिखलीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी त्या परिस्थितीत कौटूंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळल्याने द्वारकादास चिखलीकरांना आपले पोलीस विभागाचे काम करण्यात वेळ मिळाला. दोन दिवसापुर्वीच त्यांच्या आई सौ.शालुबाई यांना उपचारासाठी नांदेडला आणण्यात आले होते. त्यांचा उपचार झाल्यानंतर दहा गाडी चालक आपल्या सेवेत असतांना द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या आई सोडण्यासाठी स्वत: गाडी चालवून त्यांना घरी पोहचवून आले. यावरून कोणत्या क्षणी काय करायचे आहे. याची जाण लक्षात येते.
स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यापासून आरोपींना जेरबंद करण्याची सवय स्थानिक गुन्हा शाखेला लागली ती आज 599 दिवसांत सुध्दा कायम आहे. एका मारेकऱ्याला पकडतांना आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलेले नियोजन आजही चर्चेचा विषय आहे. कोणाला कोठे जायचे आहे. हेच माहित नव्हते. बाहेर निघाल्यावर त्यांनी दिशा निर्देश केले आणि अखेर आरोपी पकडलाच. ज्याने खून केला होता. एका अल्पवयीन बालकाला पळवून आणल्यानंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींना जेरबंद करतांना त्यातील एकाला पकडतांना चिखलीकरांनी गोळीबार केला होता. त्या व्यक्तीकडे सुध्दा पिस्तुल होते. या सर्व घटनाक्रमांत आपल्या सोबतच्या कोण्या माणसाला इजा होणार नाही याची दक्षता चिखलीकरांनी घेतली. यावरून त्यांच्यातील आपल्या लोकांची चिंता करण्याची वृत्ती दिसते. अनेक जागी घडलेल्या दरोड्यातील आरोपी शोधतांना रात्र-रात्र प्रवास करून त्यांनी आरोपींना जेरबंद केले. आपल्या कामकाजाच्या पध्दतीत अगोदर सर्वांना सर्व काही सांगणारे चिखलीकर काही दिवसांनी सतर्क झाले. कारण बिभिशणामुळेच लंका समाप्त झाली होती. याची जाणिव चिखलीकरांना सुध्दा आहे. पुढे एका खून प्रकरणातील 8 गुन्हेगार एकदाच ताब्यात घेण्याची कामगिरी चिखलीकरांनी करून दाखवली. तो घटनाक्रम एवढा सहज नव्हता.
यासोबतच अवैध दारू, गुटखा, जुगार अड्डे, बंदुका, फसवणूकीचे प्रकार, चोरी, दरोडे या गुन्ह्याची उकल करतांना त्यांनी कामगिरी लिहिण्याचे ठरवले तर आमच्याजवळचा शब्द साठा अपुर्ण होईल. 52 पत्यांचा जुगार चालविणाऱ्या अनेक किंग मेकरला त्यांनी हद्दपार केले. त्यांच्यासमोरच रडून रडून मी भिकेला लागलो असे म्हणण्याची पाळी त्या जुगार चालकांवर आली. पण कधी कापले जातात तर कधी मारले जातात आपल्याच सावल्या अशा का छळतात हा प्रश्न अर्जुनाला कुरूक्षेत्रात पडला होता. त्यावेळी भगवंतांनी दिलेल्या सुचनांना ग्राह्य मानून अर्जुनाने सर्वांचा वध केला होता. त्याचप्रमाणे चुकीचे काम करणारे व्यक्ती चिखलीकरांना कधीच पसंत पडले नाहीत. पोलीस खात्याची ईभ्रत राखतांना त्यासाठी कांही पण करण्याची तयारी त्यांनी दाखवली. 599 दिवसांमध्ये करोडो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असंख्य गुन्हेगारांना गजाआड केले आणि स्थानिक गुन्हा शाखेची पताका फडकवत ठेवली. या कामामध्ये त्यांचे सहकारी अधिकारी, आणि पोलीस अंमलदार यांनी केलेली मेहनत सरदार म्हणून चिखलीकरांचा सन्मान करणारी आहे. आपला सन्मान घेतांना माझी माणसे सुध्दा त्या सन्मानाची दावेदार आहेत, तो त्यांचा हक्क आहे असे दाखवतांना कांही दिवसांपुर्वी एक फोटो काढतांना एका पोलीस अंमलारासाठी चिखलीकरांनी सर्व छायाचित्रकारांना थांबायला लावले होते. नांदेड जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात आज प्रत्येक गुन्हेगाराला तुम्ही कर्दनकाळ वाटत आहात. तुम्ही फक्त गुन्हेगारांचेच कर्दकाळ नसून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक ट्रबलसाठी ट्रबलशुटर आहात.
आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने असे जरूर सांगायचे आहे की, फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक स्वत:चा मान वाढविण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील. श्र्वास आणि विश्र्वास दोन्ही अदृश्य असतात पण दोघांमध्ये एवढी ताकत असते की, अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात. त्यामुळे श्र्वास आणि विश्र्वास या दोघांवर लक्ष ठेवा. ज्यांनी तुमच्याबद्दल कधी गरळ ओकली आहे. त्यांना हे समजून सांगा की प्रत्येक नात जुन होतांना त्यातला अर्थ नेहमी नव्याने कळत असतो. तुमच्या जीवनातील अनेक माणसे तुम्हाला कधीच विसरणार नाहीत ज्यांना तुम्ही आठवणीसाठी खुप काही दिल आहे.या संदर्भाने एक हिंदी विचारवंत म्हणतो सुनो ना ऐ संगेमरमर की मिनारे  कुच्छ भी नही है आगे तुम्हारे हे वाक्य आपल्यासाठी आम्ही शोधले आहे. तुमच्यासाठी वाहिलेले शब्द न शब्द फक्त आणि फक्त तुमचाच शोध घेत आहेत.  ही सर्व शब्दांजली तयार करतांना मी शुन्य आहे मला पाठी मागेच ठेवा. तुमच्या पाठीशी राहुल तुमची किंमत वाढवणे हेच माझे कर्तव्य आहे. कारण मी मोठा आहे पदाने नाही, संपत्तीने नाही पण वयाने तर आहेच. त्यामुळे आमच्या शब्दांना गंभीरपणे घ्या. स्तुतीचा “वा’ देखील योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी पडावा, भलत्या ठिकाणी  “वा’ दिल्यावर “नर’ देखील “वानर’ होण्याची भिती असते. आपल्या जन्मदिनी आपला शब्दावलीने सन्मान करण्याचीच आमची ताकत आहे. इतर ताकत आमच्याकडे नाही. तेंव्हा या शब्दावलीलाच पुष्पहार समजा आणि तुमची आठवण आम्हाला सदा येवो अशी सदभावना पण ठेवा. हॅपी बर्थ डे द्वारकादास चिखलीकर. – अनामिक
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *