नांदेड

वांगी गावाचे जुंन नातं, विकासासाठी कटिबद्ध-आमदार हंबर्डे

नविन नांदेड(प्रतिनिधी)-वांगी गावाचे जुंन नातं असल्याने निवडणुकीत दिलेला शब्द पाळला व खंडोबा मुर्तीच्या स्थापना व लोकार्पण सोहळा माझ्या हाताने झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे आ.मोहनराव हंबर्डे खंडोबा मंदिर देवस्थान स्थापना व लोकार्पण सोहळा प्रंसगी केले , वेळी गावाचा विकासासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले, गांवकरी यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नांदेड तालुक्यातील वांगी येथील खंडोबा मुर्तीच्या स्थापना व लोकार्पण सोहळा दि.१६ आगसषट रोजी नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हंबर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, उपसभापती प्रतिनिधी फयुम भाई, बाळु तिडके, सिध्दनाथ संरपच आंनदराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गोविंदराव पाटील वांगीकर , संरपच दता पाटील जाधव यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी सत्कार सोहळयाला उत्तर देताना वांगी पुनर्वसन गावांसाठी व सभा मंडप,सि,सि.रोड, बौद्ध विहार चा विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तर जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी जुन्या व नविन पुनर्वसन गावात विकासात्मक कामे केल्याचे सांगितले.
सुत्रसंचलन मुकताजी शहापुरे यांनी केले, तर आभार ग्रामसेवक वडजे यांनी केले .या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी लक्षमण खोडे,दिलीप जाधव,केरबा जाधव पदमाकर तारू व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ,जेष्ठ नागरिक ,युवक महिला व गावकऱ्यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.