महाराष्ट्र

राज्यातील 1181 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना बदल्या

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मंजुरीनंतर अपर पोलीस महासंचालक कुलवंत कु.सारंगल यांनी राज्यातील 1181 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये कांही विनंतीवरुन आहेत आणि कांही ज्यांनी आपला नियुक्तीचा कार्यकाळ पुर्ण केला आहे असे अधिकारी आहेत. यात 417 पोलीस निरिक्षक, 360 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 404 पोलीस उपनिरिक्षक आहेत.


स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येवर 14 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या आदेशानुसार राज्यात 294 पोलीस निरिक्षक ज्यांनी आपला नियुक्तीचा कार्यकाळ पुर्ण केला आहे आणि 123 पोलीस निरिक्षक ज्यांनी आपल्या बदलीचा कार्यकाळ पुर्ण केला नाही. अशा एकूण 417 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यात 4 पोलीस निरिक्षक येत आहेत. विनंती अथवा कार्यकाळ पुर्ण न केलेल्या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील एकही अधिकारी नाही. नांदेडला येणाऱ्या चार पोलीस निरिक्षकांमध्ये विजय नागोराव डोंगरे (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड), भगवान दत्तात्रय कापकर(दहशतवाद विरोधी पथक), माणिक विठ्ठलराव बेंद्रे (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर), जगन गणपती पवार (जिल्हा जात पडताळणी विभाग हिंगोली) असे आहेत.
312 सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्यांनी आपल्या नियुक्तीचा कार्यकाळ पुर्ण केला. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच 48 आपला कार्यकाळ पुर्ण न करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक या यादीत आहेत. नांदेड येथील पिराजी रामजी तायवाडे हे औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रात जात आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथकातील गजानन अर्जुनराव बोराटे हे नांदेड परिक्षेत्रात येत आहेत.
राज्यात 404 पोलीस उपनिरिक्षकांना बदल्या येण्यात आल्या आहेत. त्यातील पाच नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणार आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे राम हनमंत गिते, बालाजी बाबू पुंड (अमरावती शहर), सुदाम मारोती मुंडे (नागपूर शहर), महेश अशोकराव कोरे(गोंदिया), विजय बबन कोल्हे (गडचिरोली) असे आहेत. या यादीमध्ये नांदेड येथून एकाही पोलीस उपनिरिक्षकाची बदली झाली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.