नांदेड

पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या मेहनतीने शहरातील अप्रिय घटना टळली


धर्माबाबत सामाजिक संकेतस्थळांवर लिहिणे महाग पडले

नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.15 ऑगस्टच्या रात्री शिवाजीनगर भागात घडलेल्या घटनेमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दाखवलेली कणखर भुमिका ती घटना शहरात पसरण्यापासून वाचली. याप्रकरणी व्हॉटसअप संकेतस्थळावर धार्मिक शब्द टाकणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काल दि.15 ऑगस्ट रोजी रात्री गृहसेवा भांडार या दुकानावर मुस्लीम समाजाचा मोठा जमाव जमला. त्यांचा असा आरोप आहे की, गृहसेवा भांडारचे मालक दिपक कृष्णा रुद्रावार यांनी धार्मिक भावना दुखावतील असे संदेश नांदेड किराणा असोसिएशनच्या व्हॉटसअप ग्रुपवर टाकले. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या. मोठा जमाव अगोदर या दुकानावर गेला. तेथे झालेल्या बोलाचालीत दुकानाचे कांही नुकसान झाले. या घटनेला वेगवेगळे रंग देण्यात येत होते. त्यामुळे शिवाजीनगर ते आयटीआय चौक या भागात मोठीच गडबड माजली. व्हॉटसअप संकेतस्थळावर या बाबतच्या चर्चा सुरू झाल्या. घडलेल्या घटनेतील गांभीर्य लक्षात येताच पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, शहरातील जवळपास सर्वच पोलीस निरिक्षक आणि मोठा पोलीस ताफा शिवाजीनगर भागात हजर झाला.
निसार तांबोळी यांनी आक्षेप असणाऱ्या लोकांना समजून सांगितले की, गृहसेवा भांडारचे मालक दिपक कृष्णा रुद्रावार यांनी गुन्हा केला आहे. त्यासाठी कायद्यात तरतूदी आहेत. त्या तरतुदीनुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. याची माहिती देतांना निसार तांबोळी यांनी जमावाला सांगितले की, यासीन अब्दुल बारी शेख अब्दुल कादर यांच्या तक्रारीवरुन दिपक कृष्णा रुद्रावार विरुध्द भारतीय दंड संहितेतील कलम 295(अ) तसेच  माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66(क) नुसार गुन्हा क्रमांक 307/2021 दाखल करण्यात आला आहे आणि दिपक रुद्रावारला अटक करण्यात आली आहे. त्यानंतरच जमाव शांत झाला आणि शहरातील घटना शमली.
कोणीही धार्मिक घटनांबाबत सामाजिक संकेतस्थळांवर लिखाण करणे, त्यावर मत व्यक्त करणे, टिपणी करणे हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. सर्वांना आप-आपला अभिमान आहे. त्याचा आदर प्रत्येकाने करायला हवा. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी अत्यंत त्वरीत, जलदगतीने केलेल्या कार्यवाहीनंतर या धार्मिक घटनेचे स्वरुप शांत झाले. यापुढेही कोणी संकेतस्थळांवर धार्मिक शब्दंाचा वापर करतांना दक्षता घ्यावी अशी अपेक्षा आहे.

15 ऑगस्ट समारोह संपल्यानंतर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना आपल्या खाजगी कामासाठी सुट्टी घ्यावी लागली. त्यामुळे प्रभारी पोलीस अधिक्षक हे पद विजय कबाडे यांना मिळाले आणि रात्री शिवाजीनगर भागात झालेली गडबड अटोक्या बाहेर गेली. तेंव्हा पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना मैदानात यावे लागले. मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणाऱ्यांनी या घटनेकडे लक्षपुर्वकच अभ्यास करण्याची गरज आहे. एक छोटीशी घटना आणि त्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षकांना यावे लागते यावरून सर्व कांही स्पष्ट होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *