क्राईम

किटक नाशक औषधी चोरी प्रकरणात एका चोरट्याला दोन दिवस पोलीस कोठडी

या प्रकरणी पाचवा गुन्हेगार अटकेत
नांदेड(प्रतिनिधी)-शेती उपयोगी किटक नाशक औषधी चोरलेल्या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या चौथ्या चोरट्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणी पाचव्या आरोपीला आज स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे.
1 ऑगस्ट रोजी नवा मोंढा भागातील सचिन उर्फ राजू शिवप्रसाद तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष रावणवेणी आणि माधव सावंत या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला की, त्यांनी मागील दोन ते तीन महिन्यापासून त्यांच्या दुकानातील शेती उपयोगी किटक नाशक औषधी चोरली आहे. या औषधीची किंमत 32 लाख 61 हजार रुपये आहे. पोलीसांनी त्या दोघांना पकडले. त्याच्यानंतर अंकुश हरीभाऊ सुर्यतळ हा तिसरा आरोपी पकडल्या गेला. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी चौथा आरोपील शेख मुकीद शेख मुक्तार (31) रा.तेहरानगर नांदेड यास पकडले.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, शंकर म्हैसनवाड, गणेश धुमाळ आदी करीत आहेत.  पकडलेला चौथा आरोपी शेख मुकीद, शेख मुक्तार यास आज 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली तेंव्हा न्यायाधीश आर.पी.घोले यांनी शेख मुकीदला दोन दिवस अर्थात 18 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शेती उपयोगी किटक नाशक औषधी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने आज दि.16 ऑगस्ट रोजी सचिन जाधव रा.गोविंदनगर नावाच्या पाचव्या आरोपीला पकडले आहे. त्यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. किटक नाशक औषधी प्रकरणात 28 लाख 72 हजार 419 रुपयांची चोरलेली किटक नाशक औषधी स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *