क्राईम

7 लाख 70 हजारांच्या दरोड्यातील संशयीत ‘गॅंगस्टर इन युनिफॉम’ च्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-गोकुळनगरच्या बालाजी ट्रेडर्स या दुकानातून 7 लाख 70 हजार रुपयांच्या लुट प्रकरणात प्रसार माध्यमांनी दुकानाच्या नोकराची तपासणी सुरू आहे. पण कांहीच मिळाले नाही असे वृत्त प्रकाशित केले होते. पण स्वातंत्र्य दिनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील “गॅंगस्टर इन युनिफॉम’ असलेल्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक त्या दुकानातील नोकरपण आहे.
दि.11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास गोकुळनगर भागातील हनुमानदास अग्रवाल यांच्या दुकानातून 7 लाख 70 हजार रुपये रोख रक्कमेची बॅग घेवून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या नोकराने आपल्या साथीदारांना व्हॉटसऍप संदेशाद्वारे लवकर या असे संदेश दिला. या व्हॉटसऍप संदेशामध्ये हिंमतपण देण्यात येत होती की, काही होणार नाही लवकर या. भिऊ नका, मालक गेला असे संदेश प्रसारीत करण्यात आले आणि त्यानंतर आलेल्या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून 7 लाख 70 हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरून नेली.


या घटनेनंतर अनेक ठिकाणी पथके तपासणी करत आहेत, लवकरच आम्ही त्यांना जेरबंद करू असे वृत्त प्रकाशीत झाले.घडलेल्या घटनेत चिखलीकरांना हे आरोपी सापडू नयेत यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. पण पद मोठे असले तर अक्कल जास्त असतेच असे कांही नसते. कांही टपऱ्या हरिशचंद्रांना सोबत घेवून जिल्हा चालत नसतो. आणि त्यांचे फोटो आपल्यासोबत घेवून लोकांवर वचक बसत नसतो त्याच्यासाठी रक्तातच कस असावा लागतो. म्हणून काम करतांना जमिनीच्या स्तरावर माहिती घ्यावी लागते. वातानुकूलीत गाड्या आणि वातानुकूलीत कक्षात बसून गुन्हेगार सापडत नसतात.
आज 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताचे स्वातंत्र्य आले असतांना त्या समारोहाच्या कार्यक्रमांची तयारी करण्यात मोठा वाटा असलेल्या द्वारकादास चिखलीकर यांनी बालाजी ट्रेडर्समध्ये झालेल्या दरोडा प्रकरणी आपले लक्ष केंद्रीत करून चिखलीकर यांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.यात एक बालाजी ट्रेडर्समध्ये काम करणारा माणुस सुध्दा आहे. ही कार्यवाही अद्याप गुप्त असली तरी त्यातील जबरदस्त कामगिरी लपण्यासारखी नाही. कोणी त्यावर गृहण लावण्याचा प्रयत्न केला तरी सत्य ते सत्यच असते. अशा प्रकारे आपल्याविरुध्द खलबत तयार करणारे तयार असतांना द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकासोबत केलेली ही कामगिरी प्रशंसनियच आहे.

व्यवसायिकांनी आपल्या येथे काम करण्यासाठी माणसे ठेवत असतांना त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे हे बालाजी ट्रेडर्समधील घटनेनंतर समोर आले. कांही लोक असेही सांगतात की, बालाजी ट्रेडर्समध्ये यापुर्वी सुध्दा असा एक प्रकार झाला होता पण तो पोलीसांपर्यंत आलाच नाही. पोलीस विभाग नेहमीच जनतेला आवाहन करत असते की, कांही शंका असेल, कांही रिस्क असेल तर पोलीसांशी संपर्क साधावा. नोकर ठेवतांना पोलीसांसोबत संपर्क ठेवून त्या व्यक्तीबद्दलची माहिती जाणून घ्यावी, म्हणजे अशा घटना घडणार नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *