नांदेड

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना तिरंग्याला नमन करण्याची गरज नाही काय ?

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना भारतीय तिरंग्या ध्वजाला प्रणाम करण्याची गरज वाटत नाही असे प्राप्त झालेले चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे.
                         आज भारतीय स्वातंत्राचा ७५ वा अर्थात अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे.आज सकाळी ९.०५ वाजता प्रशासकीय समारोह जिल्हाधिकारी कार्यालयात होता.पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सुरू करताच व्यासपीठासह उपस्थित प्रत्येक नागरिकाचा हात जय हिंद अवस्थेत आला.पण नांदेडचे नामांकित जिल्हाधिकारी यांना भारतीय ध्वजाला प्रणाम करण्याची काही एक गरज वाटली नाही.प्राप्त झालेला फोटो भयंकर बोलका आहे,त्यात दिसणारे डॉ.विपीन हे एकटेच आहेत ज्यांचा हात भारतीय ध्वजाला प्रणाम करण्यासाठी तयार नव्हता.
                        पालकमंत्री अशोक चव्हाण,वर्षा ठाकूर,निसार तांबोळी,प्रमोदकुमार शेवाळे आणि त्या फोटो दिसणारा प्रत्येक व्यक्ती भारतीयांची आन बान शान असलेल्या तिरंग्याला प्रणाम करीत आहे.एक आणखीन डॉ.विपिनचे साथीदार या छायाचित्रात दिसत आहे.ध्वज संहिता पाळावी,किंबहुना हि पाळणे प्रत्येक भारतीयांवर बंधनकारक आहे. पण छायाचित्रात दिसणारे डॉ.विपीन यांना मात्र ध्वज संहिता माहित नाही असे कसे म्हणता येणार आहे.
                      लॉक डाउन बाबत दररोज नवीन नवीन आदेश काढून चूक करणाऱ्यांना साथ रोग प्रतिबंधक कायदा दाखवणाऱ्या डॉ.विपीन यांनी मास्क सुद्धा परिधान केलेला नव्हता.लोक सांगतात की,व्यासपीठावरचे भाषण अंमलात आणायचे नसते फक्त बोलायचे असते.तेच खरे असेल. पालकमंत्री बोलत असतांना त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक राखा अशी विनंती मी करत आहे,तेव्हा अनेक काँग्रेस जनानी आप आपल्या खिश्यातुन मास्क काढून तोंडावर लावले. सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांना जनतेवरच कायदयाचा बडगा चालवायचा आहे. पण स्वतः साठी कायदा नाही.काही नेते मंडळी सांगतात कि जेवढे कायदे तेव्हढ्याच पळवाटा असतात.अशी आहे हि कायदा करणारी मंडळी.
                          जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क वापरला नाही पण भारतीय तिरंग्या ध्वजाला प्रणाम केला नाही हे कसे समजून आम्ही का समजून घ्यावे या प्रश्नाला उत्तर कोण देणार आणि डॉ.विपीन यांना तिरंग्याचा अवमान केला असे कोण विचारणार ? बॅंड पथकाने पहिला सूर लावताच हात वर व्हावा असे अपेक्षित आहे.तसेच बँड शेवट होताना आपली विशेष कृती करून ड्रम वाजवतो तेव्हा तिरंग्याला नमस्कार करण्यासाठी वर उचललेला हात खाली आणायचा असतो.ते प्रत्येक भारतीयाच्या मनावर ठसलेले आहे. जास्त लिहिले तर प्रशासनाविरुद्ध लिहितो अशी वावडी उठवली जाते. असो जे दिसले तेच लिहिले आहे. प्रसार माध्यमांनी बातम्या कश्या लिहाव्यात याचे धडे दिले जातात. काही जणांना अधिकाऱ्यामार्फत दिवाळी खराब करून घ्यायची काय ? अशी विचारणा केली जाते.काय होईल या देशांचे आता. लोकशाही चालेल कि सरंजामशाही देवालाच माहित.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.