महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज  फडकणार

नांदेड,(प्रतिनिधी)-सबंध भारतीयांसाठी अभिमान असलेला हिंदुस्थानचा तिरंगा हा देशात दोन ठिकाणी तयार होतो. एक नांदेडच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत आणि कर्नाटकातील हुबळी येथील संस्थेत. यावर्षीचा लाल किल्ल्यावर फडकणारा हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज हा नांदेडमधून गेला आहे. उद्या तो अभिमानाने फडकणार आहे.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यासाठी देशातील दोन शहरांची निवड झाली. नांदेडची मराठवाडा खादी ग्रामोद्योग संस्था आणि हुबळीची एक संस्था या संस्थेत तयार झालेले राष्ट्रध्वज दरवर्षी देशाच्या कानाकोपNयात जातात. महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात त्याचे वितरण होते. दरवर्षी दिड ते अडीच कोटी रुपयांचे ध्वज देशभर वितरीत केले जातात. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे राष्ट्रध्वजांची विक्री ५० टक्के एवढीच झाल्याची माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. १४ बाय २१ पुâट इतका आकार असलेला हा राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर, राष्ट्रपती भवनात, राज्याच्या मंत्रालयावर डौलाने फडकत असतो. उद्या लाल किल्ल्यावर देखील नांदेड येथे तयार झालेलाच हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज डौलाने फडकणार आहे. जिल्हास्तरी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत आठ बाय बारा आणि सहा बाय नऊ या आकाराचे राष्ट्रध्वज ठरलेले असतात. त्याची विक्रीही नांदेडच्याच वेंâद्रातून होत असते. येथूनच हे ध्वज वितरीत केले जातात.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी १९६७ साली मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. मराठवाड्यात तेलंगणा आणि कर्नाटकात त्यांनी याच्या शाखाही सुरु केले. सरदार वल्लभभई पटेल या संस्थेचे मार्गदर्श होते. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी या संस्थेत संस्थापक सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या संस्थेअंतर्गत सातशेहून अधिक कारागीर काम करीत असून, चार मोठी उत्पादन वेंâद्र व नऊ उपवेंâद्राच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योगचा कारभार चालतो.
देशाला राष्ट्रध्वज देणारी ही संस्था मोठ्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. अशाही परिस्थितीत उत्पादनात खंड न पडू देता वेगवेगळी उत्पादने या खादी ग्रामोद्योगातून तयार होतात.
उद्या देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर नांदेडचाच राष्ट्रध्वज फडकणार असून, नांदेडकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *