क्राईम

समोर खानावळीचा बोर्ड लावून आत चालतो मटका जुगार

नांदेड(प्रतिनिधी)-समोर खानावळीचा बोर्ड लावून आतमध्ये मात्र मटका जुगार चालवला जातो. कांही दिवसांपुर्वीच या भागामध्ये पोलीस उपमहानिरिक्षकांच्या पथकाने मटका जुगारावर छापे टाकले होते. तरीपण मटका जुगार चालकांना त्याची भिती वाटत नाही.
नांदेड शहर पुर्व दिशेकड असणाऱ्या छत्रपती चौकामध्ये आज फिरत-फिरत एका खानावळीचा बोर्ड पाहुन त्या ठिकाणी जेवनाचा विचार मनात घेवून आत गेलो असतांना अजबच प्रकार दिसला. त्या ठिकाणी मटका हा जुगार सुरू होता. जवळपास 300 चौरसफुट एवढा मोठा भाग मटका चालविण्यासाठी तेथे आरक्षीत आहे. दोन वेगवेगळे टेबल लावून दोन वेगवेगळे व्यक्ती त्या ठिकाणी जुगाराच्या चिठ्‌ठ्या लिहित असल्याचा  व्हिडीओ, फोटो उपलब्ध झाला. कोणाचीही भिती नाही असे या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
कांही दिवसांपुर्वीच या भागात पोलीस उपमहानिरिक्षकांच्या पथकांनी मटका जुगारावर छापे मारून त्या लोकांविरुध्द गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सुध्दा मटका जुगार सर्रास सुरू आहे. यावरून मटका चालकांमध्ये कोणाची भिती नाही असेच दिसते. नांदेडमध्ये कार्यरत “सुर्याजी पिसाळ’ यांच्या आशिर्वादाने या मटका जुगार चालकांना कोणाची भिती वाटत नाही असे पोलीस दलातील लोक सांगत होते. पोलीस दलात सुर्याजी पिसाळांची हद्द काय, त्यांच्याकडे अतिरिक्त अधिकार आहेत काय या प्रश्नांची उकल व्हायची असेल तर त्यासाठी एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. सुर्याजी पिसाळांच्या काही “करवले’ हे सर्व कामकाज पाहतात त्यामुळे इतर पोलीस अंमलदार नाराजच आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *