नांदेड

मनपाने 3.5 क्विंटल प्लास्टीक जप्त करून 10 हजार दंड ठोठावला

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने 14 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी साठवून ठेवलेले 3.5 क्विंटल प्लास्टीक जप्त करून दहा हजार रूपये दंड ठोठावला आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी मनपा आयुक्तांच्या आदेशाने विविध पथके तयार करून क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 च्या हद्दीत अनेक ठिकाणी प्लास्टीक साठवण करून ठेवलेल्या कॅरीबॅग, पाण्याचे पाऊच असे एकूण 3.5 क्विंटल प्लास्टीक जप्त करण्यात आले. प्लास्टीक बाळगणाऱ्यांकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सहायक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक, क्षेत्रीय अधिकारी मिर्झा रफतुल्ला बेग, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गंदमवार, शेख नईम, सतिष मुकापल्ले, रतन रोडे आणि विजय वाघमारे यांनी ही कारवाई केली. महानगरपालिकेने आवाहन केले आहे की, प्लास्टीक वापणाऱ्यांविरूद्ध यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे प्लास्टीकचा वापर टाळावा.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.