महाराष्ट्र

देशात 1 हजार 380 पोलिसांचा सन्मान; राज्यात 74 पदके; मुदखेड येथील केंद्रीय राखीव बलाचे समादेशक डॉ. दिनेशकुमार मिश्रा

नांदेड (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येवर देशात 1 हजार 380 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर केली आहेत. त्यात 2 राष्ट्रपती पोलीस पदक (पी.टी.एम.जी), 628 पोलीस शौर्य पदक (पी.एम.जी.), 88 राष्ट्रपती पोलीस पदक (पी.पी.एम.) आणि 662 पोलीस पदक (पी.एम.) जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रात 74 पोलिसांना  हे पदक प्राप्त झाले आहेत.
शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्रात 1 राष्ट्रपती पोलीस पदक पोलीस हवालदार सुनील दत्तात्रय काळे केंद्रीय राखीव पोलीस दल यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले आहे. सेवापदक श्रेणीत महाराष्ट्रात 3 राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले आहेत. त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक आयुतोष कारभारी डुंबरे मुंबई, पोलीस उपनिरीक्षक ओजर एअरपोर्ट सुरक्षा अशोक उत्तम अहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक यवतमाळ येथील विनोदकुमार ललताप्रसाद तिवारी यांना जाहीर झाले आहे.
पोलीस शौर्य पदकात महाराष्ट्रातील 25 पोलिसांना हे पदक बहाल झाले आहे, त्यात लिंगनाथ नायय्या पोट्रेट पोलीस हवालदार, मोरेश्वर पतलु वेलाडी पोलीस नाईक, बिच्छू पोच्चा सिद्धम पोलीश शिपाई, श्यामसे ताराचंद कोडापे पोलीस शिपाई, नितेश गंगाराम वेलाडी पोलीस शिपाई, गोवर्धन धनाजी कोळेकर सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त कोळेकर हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत होते), हरी बालाजी एन. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, प्रविण प्रकाशराव कुलसम पोलीस नाईक, सडवली शंकर आसम पोलीस नाईक, योगेश देवराव पाटील पोलीस उपनिरीक्षक, सुदर्शन सुरेश काटकर पोलीस उपनिरीक्षक, रोहिदास सेलुजी निकुरे पोलीस हवालदार, आशिष देवीलाल चव्हाण पोलीस नाईक, पोलीस शिपाई पंकज सिताराम हलामी, आदित्य रविंद्र मडावी, रामभाऊ मनुजी हिचामी, शिवपुंडलिक गोरले, मोगलशहा जीवन मडावी, ज्ञानेश्वर देवराम गावडे, विनायक विठ्ठलराव हाटकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी, पोलीस नाईक ओमप्रकाश मनोहर जामनीक, सहायक पोलीस निरीक्षक मंजुराम हुचप्पा सिंगे, अरविंदकुमार पुराणशाह मडावी,  पोलीस उपअधीक्षक नवनाथ टकाजी ढवळे.


सेवापदक श्रेणीत महाराष्ट्रात 45 पोलिसांना पोलीस पदक हा सन्मान मिळाला आहे. समादेशक मधुकर किशनराव सतपुते, पोलीस उपायुक्त तांत्रिक शेखर गुलाबराव कुऱ्हाडे, सुरेंद्र मधुकर देशमुख, जोत्सना विलास रसम, सहायक समादेशक ललित रामकृपाल मिश्रा, पोलीस निरीक्षक मधुकर गणपत सावंत, संजय देवराव निकुंबे, दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, कल्याणजी नारायण घेटे, चिमाजी जगन्नाथ आढाव, नितीन प्रभाकर दळवी, सशस्त्र पोलीस निरीक्षक राजेंद्र अंबादासजी राऊत, सहायक पोलीस निरीक्षक मोतीराम बक्काजी मडावी, पोलीस उपनिरीक्षक उल्हास सिताराम रोकडे, सुनील जगन्नाथ तावडे, सुरेश नामदेव पाटील, हरिशचंद्र गणपत ठोंबरे, संजय वसंत सावंत, संतोष सिताराम जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू भीमराव कानडे, विष्णु मैनाजी रकडे, पोपट कृष्णा आगलावे, सुभाष श्रीपत बुरडे, विजय नारायण भोसले, पॉल राज अंथनी, विनोद आत्माराम विचारे, भारत कोंडीबा शिंदे, अनंत साहेबराव पाटील, ज्ञानदेव रामचंद्र जाधव, सुभाष लाडोजी सावंत, नितीन बंडू सावंत, युवराज मानसिंग पवार, दीपक नानासाहेब डोणे, सुर्यकांत तुकाराम गुलबिले, पोलीस हवालदार विष्णु बहिरू पाटील, संतू शिवनाथ खिंडे, आनंदा हरिभाऊ भिल्लारे, प्रतापकुमार प्रमोथा रंजनबाला, रशीद रहीम शेख, सीएमओ केंद्रीय राखीव बल मुदखेड डॉ. दिनेशकुमार मिश्रा, पोलीस निरीक्षक गणेशा लिंगाय, मनोज नारायण पाटणकर, संतोष महादेव पवार, रेल्वे निरीक्षक सुधीर पांडूरंग शिंदे आणि उपनिरीक्षक भिमप्पा देवप्पा सागर हे पदकांचे मानकरी आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *