क्राईम

29 मार्चच्या घटनेतील दोन जणांना 132 दिवसांनंतर मिळाला जामीन

नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्च रोजी झालेल्या मारहाण प्रकरणातील दोन जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी आज अटकेनंतर 132 दिवसांनी जामीन मंजूर केला आहे.
29 मार्च रोजी एका धार्मिक कार्यक्रमाच्या कारणावरुन गडबड झाली आणि पोलिसांवर हल्ला झाल्याची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात एकूण 24 जणांना अटक केली. आजपर्यंत सर्वच तुरुंगात आहेत. या प्रकरणाचा दोषारोप दाखल करताना 53 जण फरार असल्याचे दाखविण्यात आले. या प्रकरणातील अनेक जणांनी अनेकदा जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज सादर केले. न्यायालयाने आजपर्यंत कोणालाही जामीन दिली नव्हती.
या प्रकरणात अभिजितसिंघ रजपालसिंघ सरदार यांनी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामीन अर्ज 509/2021 दाखल केला. तसेच परमजितसिंघ सरदारसिंघ पुजारी यांनी जामीन अर्ज 508/2021 दाखल केला. या दोन्ही अर्जांमध्ये आरोपीच्या वतीने ऍड.डी.के. हांडे यांनी काम केले.
डी.के.हांडे यांनी न्यायालयासमक्ष सादरीकरण करताना 27 मार्च रोजी झालेल्या एका प्रशासकीय बैठकीचा उल्लेख केला ज्यामध्ये भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांचे नाव घेवून त्यांनी 29 मार्चचा धार्मिक कार्यक्रम हा मर्यादीत परिसरात करण्याची घोषणा करण्यासाठी सांगितले होते. ही बाबच न्यायालयापासून आजपर्यंत लपवून ठेवण्यात आली होती. असे अनेक मुद्दे न्यायालयासमक्ष मांडण्यात आले. त्यात जामीन अर्जांच्या पूर्वीच्या से मध्ये आणि दोषारोपपत्रात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमधील तफावती न्यायालयासमक्ष मांडण्यात आल्या या सर्व बाबींचा विचार करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी फोटोग्राफर अभिजितसिंघ रजपालसिंघ सरदार आणि पुजारी असलेले परमजितसिंघ सरदारसिंघ पुजारी या दोघांना आज अटकेनंतर 132 दिवसांनी जामीन मंजूर केला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.