क्राईम

तलवारीने तीन बोटे तोडणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-एका माणसावर तलवारीने हल्ला करून त्याची तीन बोटे कापणाऱ्या दोन जणांना विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड  यांनी या दोघांना तीन  दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देविसिंह झामसिंह चंदेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारा सन्नी उर्फ बिमारी सोबत वाद होत असतांना रोशन  हळदे आणि शेख फय्युम  या दोघांसोबत त्यांचा अजून एक मित्र अशा तिघांनी त्यांच्या घरातील महिलांसोबत अभद्र व्यवहार केला. यात देविसिंह चंदेलने मध्यस्थी केली असता आरोपी रोशन  हळदे आणि शेख फईम यांच्यासोबत तिघांनी त्यांच्या भाऊ शीतलसिंह चंदेल यांना  जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यात देविसिंहच्या भावाने तो तलवारीचा हल्ला आपल्या हाताने अडविला. त्यात तळहातापासून तीन बोटे तुटली. सोबतच या हल्लेखोरांनी इतर मध्यस्थी करणाऱ्या लोकांवर वीटकरी फेकून त्यांना जखमी केले. या हल्यात शंकर राठोड नावाचा व्यक्तीपण जखमी झाला आहे. विमानतळ पोलीसांनी देविसिंह चंदेल यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 256/2021 दाखल केला. भारतीय दंडसंहितेची 307, 324, 336, 337, 323, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याची कलमे 4/25 यात जोडण्यात आली आहेत.
विमानतळ पोलीसांनी हल्लेखोरांपैकी रोशन सुरेश  हळदे (१९) रा.वडार गल्ली गोविंदनगर नांदेड आणि शेख फयुम शेख खय्युम (२२) रा , हबीबिया कॉलोनी देगलूर नाका नांदेड  या दोघांना अटक केली आज दि.13 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरिक्षक एन.के.ठाकूर, पोलीस अंमदार सिध्दार्थ गच्चे, विजय व्होटकर, रामदास सूर्यवंशी यांनी या दोन हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले होते. न्या.गायकवाड यांनी या दोघांना तीन दिवस,अर्थात १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *