नांदेड(प्रतिनिधी)-श्रीनगर भागातील काल रात्री झालेल्या फायरिंग प्रमाणे आता सोनु कल्याणकरला पुन्हा एकदा पोलीस सुरक्षा रक्षक द्यावा लागेल. त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार झाला. हल्लेखोर दोन होते आणि त्यांनी तीन गोळ्या झाडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
काल दि.11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास श्रीनगर भागातील पंचशिल गल्लीच्या जवळ सोनु कल्याणकर यांचे घर आहे. तेथे दुचाकीवर दोन जण आले आणि त्यातील एक वर गेला असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आणि दुसरा बाहेरच उभा होता. एकाच्या हातात बंदुक दिसते आहे आणि गोळी झाडल्याची सुध्दा कृती या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. हल्लेखोरनंतर त्या ठिकाणाच्या डावीकडे जातात. दुचाकीवर बसतात आणि पुन्हा त्याच घरापासून पंचशिल ड्रेसेसकडे रवाना होता असे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे.
सोनु कल्याणकर यांच्यासोबत अगोदर पोलीस सुरक्षा रक्षक होता. तो काढण्यात आला होता. कारण सोनु कल्याणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याची परिस्थिती आज काय आहे हे माहित नाही. सोनु कल्याणकर यांची 11 वी 12 मध्ये शिकणाऱ्या बालकांशी जबरदस्त मैत्री असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. खरे तर त्या 11 वी, 12 वीच्या मित्रांना भेटल्यावर पोलीसांना जास्त माहिती मिळू शकेल आणि या फायरिंगबद्दल सत्यता समोर येईल असे नांदेडमधील कांही नागरीक सांगतात.
सोनु कल्याणकरला अगोदर असलेला पोलीस सुरक्षा रक्षक आता परत द्यावा लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगरचे अभिमन्यु साळुंके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार या घटनास्थळावर आले होते. सुदैवाने या गोळीबारामध्ये कांही दुर्घटना घडली नाही. पण सार्वजनिक ठिकाणी गोळीबार होतो. याबाबत नक्कीच विचार करण्याची गरज आहे.
