

नांदेड,(प्रतिनिधी)- यशवंत महाविद्यालयातील उप प्राचार्य एस.बी,चव्हाण यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
यशवंत महाविद्यालतातील रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयातील तज्ञ् प्राध्यापक आणि उप प्राचार्य एस.बी,चव्हाण यांचे आज अल्पश्या आजाराने निधन झाले. अत्यंत कडक शिस्त आणि प्रेमळ असा आपल्या स्वभावाचा संगम घेऊन त्यांनी अनेक यशवंत बनवले. त्यांच्या निधनाने चव्हाण कुटुंब,मित्र परिवार,विध्यार्थी,यशवंत महाविद्यालय आदींवर दुःखाचा डोंगर पडला आहे.एस.बी,चव्हाण यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. वास्तव न्यूज लाईव्ह सुद्धा चव्हाण कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहे.