नांदेड(प्रतिनिधी)-तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांनी केले.
तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा (कोपटा) 2003 या विषयावर पोलीस अधिक्षक कार्यालय येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सत्रा सत्रात विकास तोटावार बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अभिजित संघई म्हणाले तंबाखू हा प्रकार माणसाच्या जीवनासाठी घातक आहे. डॉ.साईप्रसाद शिंदे यांनी कोपटा अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत चालणारा जिल्हा तंबाखु नियंत्रण कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा असून सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पुर्ण करणे आवश्यक असल्याचे विकास तोटावार म्हणाले. तंबाखू विक्रेत्यांनी शेैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करून नये. धोक्याची सुचना नसलेले तंबाखु जन्य पदार्थ विक्री करू नये, 18 वर्ष पेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करू नये. सार्वजनिक ठिकाणी धु्रमपान व तंबाखू जन्य पदार्थांचा वापर करू नये असे या चर्चा सत्रात सांगण्यात आले. राज्य प्रकल्प अधिकारी कु.जिया शेख, विभागीय अधिकारी भाग्यश्री राठोड, मराठवाडा विकास संस्थेचे गणेश उगले हे या कार्यक्रमात उपस्थित होते. जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी या चर्चा सत्रात उपस्थित होते. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे आणि पोलीस अंमलदार शेख शमा गौस यांनी या चर्चासत्राची आखणी केली होती.
