क्राईम

विक्की चव्हाण खून प्रकरणातील मारेकरी गंगाधर भोकरे पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑगस्ट 2020 रोजी विक्की चव्हाणचा खून केल्याप्रकरणी आजपर्यंत फरार गुन्हेगार गंगाधर भोकरेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.सोयंके यांनी 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विक्की चव्हाणचा खून झाल्यानंतर आजपर्यंत 16 आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्या दिवशी विक्कीचा खून करतांना हजर असलेला गंगाधर अशोक भोकरे यास स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्यानंतर विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन केले. आज विक्की चव्हाण खून प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 252/2020 मध्ये विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, मुलगिर, रामदास सूर्यवंशी आणि मैद यांनी न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आजपर्यंत 14 आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. कांही दिवसांपुर्वी दोन आरोपी पकडले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आता न्यायालयासमक्ष आणलेला आरोपी गंगाधर भोकरे यांने विक्की चव्हाणचा खून झाल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी ते प्रेत फिरवून प्रेतावर तिक्ष्ण हत्यारांनी वार केले होते. त्यावेळी त्याने मयत विक्की चव्हाणचे फोटो काढले होते. त्याने फोटो काढलेल्या मोबाईल जप्त करणे आहे. तो कोणाच्या संपर्कात होता याचा शोध घेणे आहे. तसेच या प्रकरणातील इतर कोणी साथीदार आहेत काय याचा शोध घेणे आहे त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती अनिरुध्द काकडे यांनी न्यायालयासमक्ष केली. युक्तीवाद ऐकून न्या.एस.एल.सोयंके यांनी गंगाधर अशोक भोकरेला चार दिवस अर्थात 15 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *