महाराष्ट्र

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड प्रशांत देशपांडे महासचिवपदी प्रमोद चांदूरकर तर कोषाध्यक्षपदी रंगराव साळुंखे

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेची निवडणूक प्रक्रिया दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी अमरावती येथे महेश भवनात पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. चंद्रशेखर डोरले व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. दिलीप तिवारी यांनी काम पाहिले तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने विजय संतान व भारतीय धनुर्विद्या संघटनेच्यावतीने निरीक्षक म्हणून चेतन कावलीकर यांनी काम पाहिले.यात अध्यक्षपदी ऍड. प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर महासचिवपदी शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा भारतीय तिरंदाजी संघाचे महासचिव प्रमोद चांदूरकर यांची व कोषाध्यक्षपदी मराठवाड्यातील हिंगोली चे सचिवपदावर रंगराव साळुंखे यांची निवड करण्यात आली.
इतर कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्याचे हरीदास रणदिवे, ठाणे जिल्ह्याचे उदय नाईक तर सचिवपदी पिंपरी-चिंचवडच्या सोनल बुंदेले यांची निवड झाली. सदस्यपदी अभिजीत दळवी (अहमदनगर) धनंजय वानखेडे (वाशिम) पुणे महात्मे (मुंबई) प्रविण गडदे (उस्मानाबाद) लक्ष्मीकांत खीची (औरंगाबाद) बाबासाहेब जाधव (सातारा) यांची निवड झाली. निमंत्रित सदस्य म्हणून शिवछत्रपती शिवछत्रपती पुरस्कार विजेते सदानंद जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी नूतन महासचिव प्रमोद चांदूरकर यांनी “हर गाव आर्चरी हर घर आर्चरी’ हे अभियान हाती घेतल्याची घोषणा करीत सन 2024 ओलंपिक मध्ये महाराष्ट्राचे आर्चर देशाला मेडल देण्यासाठी तयार करण्याचे सांगितले. त्यासाठीच गावागावात जाऊन आर्चर शोध मोहिमेचा वसा हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.सदरील निवडणुकीसाठी महाराष्ट्र विद्या संघटनेला संलग्न सर्व जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.त्यांच्या निवडीबद्दल नांदेड जिल्हा संघटना सचिव तथा प्रमुख प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड, राजेश व्यवहारे, डॉ. हंसराज वैद्य यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन कार्यकारिणीचा सत्कार करत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *