नांदेड(प्रतिनिधी)- एक वर्षापुर्वी झालेल्या विक्की चव्हाणचे खून प्रकरण आणि जुलै महिन्यात झालेल्या विक्की ठाकूरच्या खून प्रकरणा सुध्दा नाव असलेला मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद करून जबरदस्त कामगिरी केली आहे. या घटनेला जोडूनच पोलीसांनी मुदखेडमध्ये याच वर्षी झालेल्या एका दरोडा प्रकरणातील तीन दरोडेखोर जेरबंद करून दोघांची नवीन नावे निष्पन केली आहेत. पकडलेल्या तिघांकडून 77 हजार 950 रुपयांचा मुदेमाल सुध्दा जप्त केला आहे.
1 ऑगस्ट रोजी रात्री शंकरराव चव्हाण चौकात विक्की चव्हाण या युवकाचा खून झाला होता. 20 जुलै रोजी नांदेडच्या गाडीपुरा भागात विक्की चव्हाणचा मित्र विक्की ठाकूरचा खून झाला. विक्की चव्हाण खून प्रकरणात जवळपास 17 आरोपी आज गजाआड आहेत. ती कामगिरी सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेनेच केली होती. विक्की ठाकूरचा खून झाल्यानंतर अवघ्या 200 तासांच्या आत विक्की ठाकूरच्या मारेकऱ्यांमधील 7 जणांना एकाच झटक्यात द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने पकडले होते.पण या विक्की चव्हाणच्या मृत्यूनंतर त्याच्या शरिरावर तलवार आणि खंजीरने वार करून त्यांचे प्रेत कापणारा एक भेटला नव्हता. विक्की ठाकूर खून प्रकरणातले आठ गुन्हेगार जेरबंद केल्यानंतर सुध्दा द्वारकादास चिखलीकर गप्प बसले नाहीत.
त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या दोन विक्कीचा खून करणारा एक गंगाधर अशोक भोकरे हा कोठे आहे याची माहिती मिळाली. तेंव्हा द्वारकादास चिखलीकर, त्यांचे पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, संजय केंद्रे, मारोती तेलंग, रुपेश दासरवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, बजरंग बोडके, राजू पुल्लेवार, विठ्ठल शेळके, गजानन बैनवाड, बालाजी मुंडे हे त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी दोन विक्कींचा खून करण्यात महत्वाचा सहभाग असलेल्या गंगाधर भोकरेला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्यासोबत राष्ट्रपाल अशोक गजभारे(28) रा.मुदखेड, दिपक परसराम गायकवाड (25) रा.पुणेगाव आणि शिवराज बापूराव पुयड(21) रा.पुणेगाव असे तीन नवीन गुन्हेगार त्यांना सापडले. राष्ट्रपाल गजभारे,दिपक गायवाड आणि शिवराज पुयडचा समावेश मुदखेड येथील गुन्हा क्रमांक 132/2021 या दरोड्याच्या प्रकरणात सहभाग आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत शेख वसीम रा.टायरबोर्ड आणि चंद्रकांत सुभाष चौदंते रा.मुदखेड हे सुध्दा सहभागी होते याची माहिती उघड केली आहे.
पकडलेल्या राष्ट्रपाल गजभारे, दिपक गायकवाड आणि शिवराज पुयड यांना पुढील तपासासाठी मुदखेड पोलीसंाच्या स्वाधीन केले आहे. तसेच विक्की चव्हाण खून प्रकरणात सहभागी गंगाधर अशोक भोकरे (25) रा.जुना कौठा नांदेड यास विक्की चव्हाण खून प्रकरणाच्या गुन्हा क्रमांक 252/2020 मध्ये पुढील तपासासाठी विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या गंगाधार भोकरे विरुध्द इतवारा येथे दाखल असलेला गुन्हा क्रमांक 173/2021 यातील विक्की ठाकूर खून प्रकरणात सुध्दा त्याचे नाव आरोपी म्हणून नमुद आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आदींनी आपल्या कामाला सर्वात मोठे प्राधान्य नेहमीच देणाऱ्या द्वारकादास चिखलीकर आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे भरपूर कौतुक केले आहे.
