नांदेड

मोहरम सणानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केल्या सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-कोविड कालखंडाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम बंद असल्यामुळे पुढील आठवड्यात येणाऱ्या मोहरम सणासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
पुढील आठवड्यात दि.19 ऑगस्ट रोजी मोहरम हा सण येत आहे. या पार्श्र्वभूमीवर कोविड-19 आणि आरोग्य या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी मोहरम सणासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
मोहरम महिन्याच्या नव्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट रोजी “कत्ल की रात’ आणि दहाव्या दिवशी “योम-ए-आशुरा’हा दिवस 19 ऑगस्टला येतो. या दिवशी दु:खात मिरवणूका काढल्या जातात. परंतू सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे अशा मिरवणूका काढल्या जाऊ शकणार नाहीत. “मातम मिरवणूक’ कोविड कालखंडात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपल्या घरातच राहुन दुखवटा व्यक्त करायचा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेल्या बंदीमुळे असे निर्देश देण्यात आले आहे. सोसायटीमध्ये सुध्दा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. वाझ/ मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने आयोजित करायचे आहेत. ताजीया / आलम काढण्यात येणार नाही. सबील/छबिल बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. सबीलच्या ठिकाणी बंद बाटलीतील पाण्याचे वाटप करावे. त्या ठिकाणी कोविड नियमावलीचे सर्व बंधन पाळले जावेत. या सुचनेनुसार दिलेले सर्व आदेश बंधनकारक आहेत. सोबतच महानगरपालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी कांही नवीन सुचना दिल्या तर त्या सुध्दा हे सण साजरे करतांना पाळणे बंधनकारक आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *