क्राईम

पोलीस उपमहानिरिक्षक साहेब काय चाललय आपल्या राज्यात ?

नांदेड(प्रतिनिधी)- नदीपलिकडच्या पोलीस ठाण्यात  काय चालते हे पाहा हो पोलीस उपमहानिरिक्षक साहेब. बलात्कार झाल्याच्या सांगणाऱ्या महिलेची तक्रार घेवून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
दि.16 जुलै रोजी मध्यरात्री 00.40 वाजता एका पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद क्रमांक 002 आहे. यामध्ये एक 27 वर्षीय महिला आपल्या पतीसह आली  आणि ती बलात्कार झाल्याचे सांगत आहे.याबाबत पोलीस निरिक्षक यांना माहिती दिली म्हणून नोंद असे शब्द अंकीत आहेत. ही नोंद 16 जुलै 2021 रोजीची आहे.
असाच एक प्रकार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुध्दा घडल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या दिवशीच्या पोलीस ठाणे अंमलदाराने पोलीस निरिक्षकांना माझ्यासमोर असलेला प्रकार मी दाखल करतो तुम्हाला त्याबद्दल कांही वेगळे दाखल करायचे असेल तर उद्या करा असे सांगितले होते. याप्रकरातील महिला आणि त्याच्यावर झालेला प्रकार हा पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयासमोर असलेल्या चौकाजवळच्या एका इमारतीच्या खोलीत आणि गच्चीवर घडला त्यावेळेस चलचित्र सुध्दा बनविण्यात आले अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. दुसऱ्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज सुध्दा उपलब्ध आहेत तरीपण कांही कार्यवाही झाली नाही अशी चर्चा पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर व परिसरात होत आहे. त्या संदर्भाने सुध्दा पोलीस निरिक्षकांनी अदखल पात्र गुन्हा दाखल करा असे त्या दिवशीच्या पीएसओला सांगितल्याचे लोक सांगतात. त्यानंतर त्यांच्या कांही खास लोकांनी फिर्यादी आणि आरोपी दोघांना भावसार चौकात नेले होते म्हणे आणि तेथून अदखल पात्र गुन्हा दाखल करण्याचा आदेश झाला तो त्या दिवशीच्या ठाणे अंमलदाराने मानला नाही म्हणून आता त्याला तुम्ही बेशीस्त आहात, आदेश ऐकत नाही अशा आशयाचा मेमो पोलीस निरिक्षकांनी दिला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्या अगदी जवळ घडलेला हा प्रकार आणि त्या बाबत पोलीस निरिक्षकांनी दाखवलेली आस्था अत्यंत दुर्देवी स्वरुपाची आहे. पोलीस उपमहानिरिक्षक साहेब कृपया अशा घटनांकडे जाणीवपुर्वक लक्ष द्या तरच नांदेड शहरात कायद्याचे राज्य गाजेल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *