नांदेड(प्रतिनिधी)-गोपळनगर सांगवी येथे एक घरफोडी झाली आहे. लोहा तालुक्यातील बोरगाव (आ) येथे एक घरफोडी झाली आहे. देगलूर नाका येथून, आनंदनगर येथून आणि पार्डी ता.लोहा येथून एकूण तीन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 3 लाख 77 हजार 617 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
शिवाजी संभाजी पाचपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गोपाळनगर सांगवी येथे राहतात.दि.3 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपासून ते 9 ऑगस्टच्या दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कलूप काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील 3 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 82 हजार 517 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
बोरगाव (आ) ता.लोहा येथील सोपान दत्ता गायकवाड तक्रारीनुसार 8 ऑगस्टच्या रात्री 10 ते 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचे मुख्य लोखंडी गेट काढून उघड्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 2 लाख रुपये, पत्राच्या पेटीमधील सोन्या-चांदीचे दागिणे 29 हजार 100 रुपयांचे असा दोन लाख 29 हजार 100 रुपयांचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हे हे अधिक तपास करीत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अलहयात दवाखाना, देगलूर नाका येथून 4 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 ते 10.30 या एक तासाच्या वेळेत मोहम्मद अमिन मोहम्मद युनूस यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 जे.7291 ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शकील हे अधिक तपास करीत आहेत.
सुदर्शन साहेबराव चव्हाण यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जी.6740 ही शाहुनगर येथील त्यांच्या घरासमोरून 6-7 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुरूळेकर अधिक तपास करीत आहेत.
रावण मारोती मोरवळे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डब्ल्यू 3464 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी पार्डी ता.लोहा येथून 5-6 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार भुते अधिक तपास करीत आहेत.
