नांदेड,(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ वर्षीय अनोळखी माणसाचा कुजलेला मृतदेह सापडला आहे.सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी जनतेला या अनोळखी मयत माणसाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
दिनांक ९ ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत डेरला शिवारात एक अनोळखी ४५ वर्षीय पुरुष माणसाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. याबाबत सोनखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक २१/२०२१ दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक सी.आर.परिहार हे करीत आहेत.
सोनखेड पोलिसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार मयत अनोळखी माणूस ४५ वर्षांचा असेल.बांधा सडपातळ आहे.केस काळे पांढरे आहेत.उजव्या बरगडीवर तीळ आहे.त्याच्या अंगात हिरव्या रंगाचा शर्ट आहे.उजव्या पायाच्या पोटरीवर काही तरी गोंदलेले आहे. पण ओळखू येत नाही.या मयत अनोळखी माणसास कोणी ओळखत असेल तर त्यांनी माहिती दयावी असे आवाहन सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर आणि पोलीस उप निरीक्षक सी.आर.परिहार यांनी केले आहे. मांजरमकर यांचा मोबाईल नंबर ९९७०७७५४४६ या नि परिहार यांचा नंबर ९८२३३७३४९५ असा आहे.
Post Views:
614