नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद पोलीसांनी शेजारचे राज्य तेलंगणा येथून चोरून आणलेल्या चार दुचाकी गाड्या आणि एक ऍटो चोरट्याच्या घरून जप्त केला आहे.
धर्माबादचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार समतानगर धर्माबाद येथे राहणाऱ्या शेख सदाम शेख अलताफ (19) याने शेजारच्या तेलंगणा राज्यातून चोरून करून आणलेली वाहने त्याच्या घरात आहेत.त्यानुसार सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद कत्ते यांना शेख सदामच्या घराची तपासणी करण्यासाठी पाठवले. त्यावेळी पोलीस अंमलदार अलीम, नागमवाड, गुरूपवार, पवार, आनेराव आदींनी शेख सदामच्या घरी छापा टाकला. तेथे तेलंगणा राज्यातील निर्मल येथून चोरून आणलेल्या चार दुचाकी गाड्या आणि नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेला ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.1243 पोलीसांनी जप्त केले आहेत.
