क्राईम

तीन जबरी चोऱ्या, एक ऍटो चोरी आणि दोन मोटारसायकल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याला बळजबरी करून लुटण्यात आले आहे.भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाजवळ एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटण्यात आला आहे. देगलूरजवळ खानापुर रस्त्यावर एका ट्रक चालकाची लुट करण्यात आली आहे. हदगाव येथून एक दुचाकी आणि हिंगोली गेट नांदेड येथून एक दुचाकी अशा दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. तीन जबरी चोऱ्या, दोन दुचाकी चोऱ्या आणि एक चोरी अशा सर्व प्रकारांमध्ये 1 लाख 700 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
अनिल साहेबराव काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतातून दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एम.4693 वर बसून आपल्या घराकडे जुना कौठा येथे जात होते. आदीनाथ चौकाजवळ एका मोटारसायकलवर तीन युवक आले आणि त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवले. एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला आणि त्यांच्या खिशातील 10500 रुपये रोख रक्कम आणि 17 हजार रुपयांचा एक मोबाईल असा 27 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बिच्चेवार हे अधिक तपास करीत आहेत.
सिरंजनी ता.हिमायतनगर कृष्णा प्रभाकर राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता ते मोटारसायकलवरून भोकर ते हिमायतनगरकडे जात असतांना सुधा प्रकल्पाच्या चढावावर कांही जणांनी त्यांना पाणी पिण्याचे कारण सांगून थांबवले आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. देगलूर येथे सुध्दा असाच एक प्रकार झाला आहे. त्यात 6 हजार 200 रुपयांचा ऐवज 4 जणांनी लुटला आहे.
तुकाराम दत्तात्रय घालण यांनी हदगाव येथील शेतकी औषध दुकानासमोर आपल्या दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एस.5133 दि.23 जुलैच्या दुपारी 12 वाजता उभी केली ती चोरीला गेली या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
नामदेव भगवान निखाते यांनी आपली दुचाकी गाडी क्रमंाक एम.एच.26 वाय.2853 ही 22 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंगोली गेट जवळच्या फुल मार्केटमध्ये उभी केली होती ती गाडी सायंकाळी 5 वाजेदरम्यान चोरीला गेली. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार उतकर हे अधिक तपास करीत आहेत.
इरन्ना संभाजी चिमटले हे 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास देगलूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते भवानी चौक असा प्रवास ऍटोमधून करत असतांना ऍटोमधील इतर प्रवाशांपैकी कोणी तरी त्यांच्या खिशातील 7 हजार रुपये चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ताहेर अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *