नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या महसुल व वनविभागाने राज्यातील 15 उपजिल्हाधिकारी आणि 12 तहसीलदार यांना नवीन पदस्थापना देण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशावर सहसचिव डॉ.माधव वीर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. यात हनुमंत आरगुंडे नांदेड येथे आले आहेत. तसेच नांदेडचे लतिफ पठाण आता जिल्हा पुरवठा अधिकारी झाले आहेत.
बदल्या देण्यात आलेली उपजिल्हाधिकारी पुढील प्रमाणे प्रशांत खेडेकर-कळमनुरी(रोहयो कोल्हापूर), संजीव जाधववर-निवासी उपजिल्हाधिकारी औरंगाबाद(सामान्य विभाग पालघर), भगवानजी आगे पाटील-प्रतिक्षेत (वाडा ता.पालघर), पवन चांडक-प्रतिक्षेत(झोपडपट्टी पुर्नवसन मुंबई मालाड), ब्रिजलाल बिबे-पुर्नवसन परभणी(पुर्नवसन यवतमाळ), चंद्रकांत सुर्यवंशी- निवासी उपजिल्हाधिकारी(मुदतवाढ), शिरीष यादव-उस्मानाबाद(परभणी), उमाकांत पारधी-सेलू परभणी(हिंगोली), अतुल चौरमारे-हिंगोली(भोकरदन), रिता मैत्रेवार-औरंगाबाद(कृष्णाखोरे), सरिता सुत्रावे-कृषणाखोरे(लातूर), शशिकांत हदगल-अंबड जालना(निवासी उपजिल्हाधिकारी औरंगाबाद), विकास माने-निलंगा(नांदेड उपविभाग), हनुमंत आरगुंडे-रस्ते विकास प्राधिकरण महामंडळ (नांदेड भुसंपादन अधिकारी), लतिफ पठाण-उपविभागीय अधिकारी नांदेड(जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड).
नवीन पदस्थापना मिळालेले तहसीलदार पुढील प्रमाणे मनिषा तेलभाते-प्रतिक्षेत(पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), अनिता शंकरराव भालेराव-औरंगाबाद(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी बीड), दत्ता नरहरी भारस्कर-औरंगाबाद(वडवणी बीड), प्रविण लक्ष्मणराव पांडे-सोयगाव(उस्मानाबाद), संतोष बब्रुवान गोरड-भोकरदन जालना(सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय जालना), अनिलकुमार रामचंद्र हेळकर-तहसीलदार परांडा(महाराष्ट्र शेती महामंडळ), प्रणाली तायडे- मराठवाडा महसुल शिक्षण प्रबोधीनी (मुदतवाढ), आम्रपाली कासोदेकर-विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद(महाराष्ट्र महसुल न्यायाधीकरण), विठ्ठल माधवराव परळीकर-लोहा नांदेड(हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय), शोभा पुजारी-औसा(संगायो लातूर), संजय पवार-उमरगा(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद), विद्या मुंडे-महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली).
