नांदेड(प्रतिनिधी)-पॉवरग्रीड कॉरपोर्रेशन ऑफ इंडियाच्या निवघा बाजार येथील स्टेशन हॉऊसचे कुलूप तोडून 3 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. भोकरमध्ये एक मोबाईल चोरीला गेला आहे.
पॉवरग्रीड कंपनीच्या पुर्नप्रक्षेपण केंद्रातून दि.29 जुलै 2021 च्या सायंकाळी 5 ते 30 जुलैच्या सकाळी 11 वाजेदरम्यान मौजे निवघा ते येळम जाणाऱ्या रस्त्यावरून कोणी तरी चोरट्यांनी 21 बॅटऱ्या ज्यांची किंमत 3 लाख 15 हजार रुपये आहे. ते चोरून नेल्या आहेत. हदगाव पोलीसांनी नागाभूषणराव आदीनारायण दासरी यांच्या तक्रारीवरुन हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुंडीक अधिक तपास करीत आहेत.
शहरातील भाग्यनगर, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लोहा, आणि बारड या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या दुचाकींची किंमत 1 लाख 34 हजार रुपये आहे.भोकर शहरातून एका मंदिरासमोर बसलेल्या माणसाचा 26 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे. सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 4 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
