नांदेड विशेष

सुर्याजी पिसाळाला अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस निरिक्षकावर दबाव आणावा लागतो

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पोलीस दलात “सुर्याजी पिसाळांची’ भुमिका निभावणाऱ्यांना आता अदखल पात्र गुन्हे दाखल करून घेण्यासाठी सुध्दा पोलीस निरिक्षकांवर दबाव आणावा लागत आहे. यावरुन नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात किती खालच्या स्तरावर कारभार सुरू झाला याचे दर्शन होते.
नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात कांही महिन्यांपुर्वी आलेल्या एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याला राज्याचा कारभार अर्थात जिल्ह्याचा कारभार चालविण्याची स्वप्ने पडू लागली आणि स्वप्नांमध्ये आपल्या कांही “उचापतीखोर’लोकांना सोबत घेवून जिल्ह्याचा कारभार आपण चालवणार आहोत असा प्रचार सुरू केला. “लायकी’ नसलेल्या या महाशयाने अनेकांबद्दल अपशब्दांचा उपयोग केला. या अपशब्दांमुळे त्याच्या जवळ असणारी मंडळी दुर गेली. त्याचा परिणामही होवू लागला. सुर्याजी पिसाळ आज जिल्ह्यातील पोलीसांनाच नव्हे तर सर्वसामान्य माणसाला सुध्दा कळायला लागला. अनेकांनी त्याने केलेल्या अन्यायाचे अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले. सुर्याजी पिसाळ असाही प्रचार करत होतो की, नांदेड जिल्हा माझ्या शिवाय चालणार नाही.
29 मार्च रोजीच्या घटनेबाबत पोलीसांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. खरे तर त्या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी समितीकडून पडताळणी होणे आवश्यक आहे. म्हणजे त्या दिवशी काय घडले होते हे सत्य समोर येईल. कारण कांही दिवस अगोदर सर्व कारभार सुर्याजी पिसाळांच्या हातात होता. घटना घडल्यावर मात्र सुर्याजी पिसाळला नांदेड जिल्ह्याच्या महाराजांनी वेगळे केले आणि सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यामुळे या प्रकरणातील पुढे उदभवणारे अनेक प्रसंग थांबले. सुर्याजी पिसाळांच्या अखत्यारीत सुरू असलेल्या या कामामुळे अनेक निष्पाप लोक फसले त्याबाबत काल राज्यपालांना सुध्दा निवेदन देण्यात आले होते.
आपल्याविरुध्द तयार झालेल्या या परिस्थितीला सांभाळण्यासाठी सुर्याजी पिसाळने नांदेड जिल्ह्यातील राजा हरिशचंद्राची मदत घेतली. नाव हरिशचंद्र असले तरी समाजात किंमत शुन्य असलेल्या या व्यक्तीच्या फॉर्म हॉऊसवर कोंबड्यांचे बळी दिले. आपल्या त्या ठिकाणच्या फोटो व्हायरल होणार नाहीत याची दक्षता घेतली. पण हरिशचंद्राने सुर्याजी पिसाळांचा फोटो व्हायरल केल्या होत्या. कारण त्याला तर असे सुर्याजी पिसाळ मी खिशात ठेवतो असे सांगण्याची सवय आहे. पण व्हायरल केलेल्या फोटो काढून टाकाव्या लागल्या कारण सुर्याजी पिसाळला माहित होते की, या फोटो आपल्यासाठी धोकादायक आहेत.
हरिशचंद्राने कांही पत्रकारांविरुध्द पोलीस ठाण्यात दिलेला अर्ज आणि त्यावरील कार्यवाही ही त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक करायला तयार नव्हते. तेंव्हा हरिशचंद्राला सुर्याजी पिसाळाचे पाय धरावे लागले आणि मग सुर्याजी पिसाळाने त्या पत्रकारांविरुध्द अदखल पात्र गुन्हा दाखल करण्याचा दबाव पोलीस निरिक्षकावर आणला आणि मग पोलीस निरिक्षकाने तो गुन्हा दाखल केला. कायद्याच्या पुढे पत्रकार सुध्दा मोठे नाहीत या प्रकरणाचे पोस्टमार्टम होईल तेंव्हा सुर्याजी पिसाळाच्या नावावर कांही येणार नाही पण ज्यांच्या नावावर येईल ती मंडळी नक्कीच सुर्याजी पिसाळाला श्राप दिल्या शिवाय राहणार नाही.
एका माणसाने आपले दु:ख व्यक्त करतांना आपल्या जीवनातील घटना सुर्याजी पिसाळाच्या खास चमच्याला सांगितली होती. त्या चमच्याने ती घटना सुर्याजी पिसाळाला सांगितली. सुर्याजी पिसाळाने तो प्रकार हरिशचंद्राला सांगितला हरिशचंद्र तर हरिशचंद्रच आहे. त्याने त्या घटनेचा प्रचार करण्यास सुरूवात केली. यावरुन दोन मित्रांमध्ये आग ओकून भांडण लावण्याचा हा प्रकार त्या दोन्ही मित्रांना लक्षात आला आणि त्यांनी सध्या तरी प्रतिप्रहार करण्याची तयारी सुरू केली आहे. हरिशचंद्राला जिल्ह्यातील असंख्य सर्वसामान्य नागरीक, अनेक अधिकारी त्रासले आहेत. जरासंघाचे 100 पाप भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याचे मुंडके उडवले होते असाच प्रकार सुर्याजी पिसाळ आणि हरिशचंद्राचा पण होईल. आपल्या कांही “करवल्यांच्या’ माध्यमातून संपत्ती गोळा करण्यासाठीच नांदेड जिल्ह्यात आलेल्या सुर्याजी पिसाळाला सुध्दा जरासंघ व्हायची वेळ येईल. ज्या लोकांनी इतरांवर चिखल फेक करण्यासाठी तयारी केली आहे त्यांनी, “निकले है ओ लोग मेरी शस्खीयत बिगाडने, किरदार उनके खुद मरम्मत मांग रहे है..!’ हे वाक्य जरूर लक्षात ठेवण्याची गरज आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.