नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मटका जुगार आजही अव्याहतपणे सुरू आहे असे एक चित्र छत्रपती चौकाजवळ असलेल्या एका दुकानातून प्राप्त झाले आहे. नांदेड शहर उपविभागाचे दमदार पोलीस उपअधिक्षक असतांना सुध्दा हा मटका जुगाराचा प्रकार सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात शहर पोलीस पोलीस उपअधिक्षक पदावर नेमणूक झालेले चंद्रसेन देशमुख हे खुप मोठे व्यक्ती आहेत, त्यांचे खुप नाव आहे, नामांकित जागी त्यांनी नोकरी केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांचा मी खास आहे असे ते स्वत: सांगतात. पण त्यांच्या हद्दीतील छत्रपती चौकाजवळ एका टोलजंग इमारतीमध्ये मटक्याचा अड्डा जोरात सुरू आहे. चारही बाजूला मटक्यांचे आकडे लिहिलेले पोस्टर जोडलेले आहेत. म्हणजे मटका हा जुगार सुरूच आहे.
मटका जुगारामुळे अनेक लोकांना व्यवसाय मिळतो. कांही लोकांना चिरीमिरी मिळते. चिरीमिरी घेणारे इतरांना तुम्ही पण घ्या मी पण सांगतो असे सांगतात. पण मटका जुगार नांदेडमध्ये चालायला हवा यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न असतात. खर तर मटका जुगार चालू द्यायला हवा कारण गरीबांना मटका जुगार जेथे खेळता येतो त्या जागा बंद करून काय भले होणार. जी मोठी व्यक्ती या मटका जुगारात आहेत त्यांना तर हात लावण्याची हिंमत कोणाची नाही. अशा परिस्थितीत मटका हा खेळ सुरू असायला हवा असे लिहावेसे वाटते.