नांदेड

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी अनुसूचित जातीच्या निधीत भ्रष्टाचार केला; वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोलेंचे राज्यपालांना निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी अनुसूचित जातीच्या साहित्यरत्न, लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील निधीमध्ये आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार केल्या संदर्भाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नांदेड दौऱ्यात दिले आहे.
शासनाच्या सामाजिक व न्यायविभागाकडून जिल्हा नियोजन समितीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागासाठी निधी दिला जातो. नियोजन समितीच्या मान्यतेने यातील निधी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेला वर्ग होतो. सन 2018-19 आणि 2019-20 या दोन्ही आर्थिक वर्षात मिळून 35 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली होती. या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये नांदेड महानगरपालिकेने कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले नाहीत.
माजी मनपा आयुक्त यांनी नवीन 128 कामांचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेला पाठवले होते. पण ते सभे पुढे ठेवण्यातच आले नाही. वेगवेगळ्या प्रकारचे दबाव वापरून अनुसूचित जातीच्या नागरीक कल्याणासाठी प्राप्त झालेल्या मुलभूत सुविधेचा निधी वेळेवर खर्च करू दिला नाही. आयत्या वेळी 35 कोटी रुपयांमध्ये 15 कामे मंजुर करण्याचा ठराव मंजूर केला. ती कामे शासनाच्या अन्य योजनांमधून पुर्ण करण्यात आली. तीच कामे करून पुन्हा शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार करण्यात आला.
सध्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दोन्ही वर्षातील कोषागार कार्यालयातून उचलेला 35 कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य रित्या जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या खात्यात रोखून धरला. मुदतीनंतर शासन खात्यात समर्पित केला नाही. त्यामुळे आर्थिक अनियमितता करून भ्रष्टाचारा मार्ग मोकळा झाला. हा रोखून धरलेला शासन निधी 26 मे 2020 रोजी मुक्त करून महानगरपालिकेकडे वर्ग केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देतांना प्रस्तावांची कोणतीच छाननी केली नाही. या सर्व प्रकरणांची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय, नगर विकास , महसुल, वित्त तसेच गृह विभागाच्या संयुक्त सचिवांची समिती नेमूण खास चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे या निवेदनात प्रशांत इंागेले यांनी लिहिले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *