क्राईम

11 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्याविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील विशेषत: म्हणजे या भागातील प्रत्येक समाजाच्या नागरीकाने या गुन्हेगाराविरुध्द कार्यवाही व्हावी यासाठी भरपूर मेहनत घेतली.
एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यंाच्या शेजाऱ्याने त्यांना कडीपत्ता मागितला. माझ्या हाताला धुळ लागली आहे. तो कडीपत्ता माझ्या टेबलवर ठेवून दे असे सांगून 11 वर्षाची बालिकेला आपल्या घरात बोलावले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडला. या बालिकेची आई इतरांच्या घरी धुणे-भांड्याचे काम करून आपले जीवन चालवते. आपले काम करून परत आल्यावर बालिकेने घडलेली हकीकत आपल्या आईला सांगितली. ज्या माणसाबद्दल बालिकेने सांगितले त्याचे नाव रमेश केसरे असे आहे. घटनेची माहिती मिळताच या भागातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने घडलेला प्रकाराचा निषेध करत भाग्यनगर पोलीसांना याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याची विनंती केली. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांनी महिला पोलीस उपनिरिक्षक ननवरे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास दिला आहे.
या घटनेची माहिती जशी पसरली. या भागातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीवर त्वरीत कार्यवाही करावी अशी विनंती पोलीसांना केली. या वरुन माणुसकी आजही जिवंत आहे हेच दिसले. अनेकदा माणुसकी संपत आली आहे अशी प्रकरणे घडत असतांना माणुसकीतील हा प्रकार दखल घेण्यासारखा आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *