नांदेड(प्रतिनिधी)- भोकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या प्रेरनेत महाराष्ट्र मधील तमाम युवक मनसे सैनिक झाले. माधव मेकेवाड यांना भोकर विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने अनेक कार्यकर्ते आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरल्याने नांदेड जिल्हात चोहीबाजूने मनसे सर्वत्र झाली आहे. पक्ष प्रवेश करणारे आजून दिग्जज कार्यकर्ते असल्याने नांदेड मध्ये मोठे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला मिळणार आहे. आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी अधिक फायदेशीर मानली जात आहे. मे, जून, जुलै महिन्यांत अनेक तालुक्यात शिवसेना सह अन्य पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा दररोज मनसेत प्रवेश झाला.नांदेड जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अगदी थोड्या दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करून आपला ठसा उमटवणारे माधव मेकेवाड नेहमी चर्चेत असतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी अग्रेसर होईल ह्या साठी राजसाहेब ठाकरे सोबत कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले हिंदुत्वाचा व मराठी मनाचा अजेंडा आज साहेबाच्या हातून होणार त्या साठी आम्ही आमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ पक्ष वाढीसाठी जीवापाड प्रयत्न करून आगामी सर्व भोकर नगरपरिषदवर होणारी निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकवू असे माधव मेकेवाड यांनी पक्ष प्रवेश झाल्यानंतर सांगितले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग भाऊ जहागिरदार, शहरध्यक्ष अब्दुल शफीक, महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ.उषाताई नरवाडे, महिला जिल्हा सचिव श्रीमती उज्ज्वला सुर्यवंशी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ सुनेवाड, विद्यार्थी सेना शहरध्यक्ष अनिकेत परदेशी देखील यावेळी उपस्थित होते.
