

नांदेड(प्रतिनिधी)-41 वर्षानंतर भारताच्या हॉकी टीमने ऑलम्पीक खेळामध्ये कास्यपद जिंकल्यानंतर शिरोमणी दुष्ट दमन क्रिडा युवक मंडळाने सचखंड दरबारासमोर आतिषबाजी करून आनंद साजरा केला.
41 वर्षानंतर भारतीय हॉकी टीमने ऑलम्पीक क्रिडा स्पर्धेत कास्य पदक जिंकतांना जर्मनी या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला पाच विरुध्द दोन गोलने पराभूत करून कास्य पदक जिंकले. हा आनंद साजरा करतांना नांदेड येथील शिरोमणी दुष्ट दमन क्रिडा युवक मंडळाने आणि खालसा युथ क्लब महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव गुरमितसिंघ नवाब यांच्या नेतृत्वात आतिष बाजी करून, बॅन्ड वाजवून आपला आनंद साजरा केला. याप्रसंगी नांदेडमधील अनेक हॉकी प्रेमी आणि क्रिडा प्रेमी उपस्थित होते.